Nandurbar News : शहादा पोलिसांनी रोखला बालविवाह

Child marriage  News
Child marriage Newsesakal

Nandurbar News : बुपकरी (ता. शहादा) येथील एका बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा पोचला व बालविवाह रोखत पालकांची समजूत काढत वयात आल्यानंतर दोघांचा ठरलेला विवाह करण्यास सांगितले. पालकांनीही त्याला होकार देत झालेली चूक मान्य केली. (Shahada police prevented child marriage nandurbar news)

बालविवाहांना प्रतिबंध करणे, तसेच महिलांविषयक कौटुंबिक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा उपक्रम या वर्षी ८ मार्च २०२३ ला जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे सुरू करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक पाटील यांना शुक्रवारी (ता. २१) शहादा तालुक्यातील बुपकरी येथील एका अल्पवयीन मुलीचा डांबरखेडा (ता. शहादा) येथील एका मुलासोबत शनिवारी (ता. २२) बालविवाह होणार असून, आज हळदीचा कार्यक्रम सुरू आहे, अशी माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक पाटील यांनी ही माहिती शहादा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांना दिली.

तेथील अक्षता समितीमार्फत बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार पोलिस निरीक्षक मोरे यांनी अक्षता समितीचे सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली. बुपकरी येथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. तेथे अक्षता समितीच्या सदस्यांनी जाऊन मुलाच्या व मुलीच्या नातेवाइकांना त्यांच्या जन्मतारखेबाबत विचारपूस करून आधारकार्डची मागणी केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Child marriage  News
Shivaji Chumbhale : हे तर राजकीय षडयंत्र, आमदारांनी केलेले आरोप तथ्यहीन; माजी सभापती चूंभळे यांचे खंडन

आधारकार्डची पाहणी केल्यानंतर अल्पवयीन मुलगी १४ व मुलाचे वय २४ वर्षे असल्याचे निदर्शनास आले. अक्षता समितीने अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाइकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत माहिती देऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांचे मनपरिवर्तन केले. अल्पवयीन मुलीच्या पालकांना शहादा पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना ही बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

"मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे महिलांवर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह करणाऱ्या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाइकांना दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावास व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात." -पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक

Child marriage  News
Dhule News : शिंदे, फडणवीसांच्या हस्ते जिल्हाधिकारी शर्मा सन्मानित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com