Fertilizer scam
sakal
शहादा: शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनुदानित यूरियाचा चक्क वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट डीईएफ निर्मितीसाठी वापर होत असल्याचा खळबळजनक प्रकार शहादा तालुक्यात उघडकीस आला आहे. कृषी विभागाने छापा टाकून पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांविरुद्ध सारंगखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.