धुळे- ‘मुला- मुलींना शाळेत पाठवू या, सारे शिकू या, पुढे जाऊ या, चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला, आधी रोटी खाएंगे, स्कूल जरुर जाएंगे, बच्चे मांगे प्यार दो, शिक्षा का अधिकार दो...’ अशा जयघोषात नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा कुठे बैलगाडीतून, तर कुठे बग्गीतून मिरवणूक काढून शाळा प्रवेशोत्सवाचा लक्षवेधी सोहळा झाला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत तिखी (ता. धुळे) येथे प्रवेशोत्सव सोहळा झाला.