Dr Praveen Gedam
sakal
सोनई: नाशिक विभागीय आयुक्त तथा शनैश्वर देवस्थानचे प्रशासक डाॅ. प्रवीण गेडाम यांनी देवस्थानला अचानक भेट दिली. भाविकाचा वेश परिधान करून त्यांनी पुजा साहित्य व त्यातील अर्थपूर्ण घडामोडी जाणून घेतल्या. शुक्रवारी (ता. २६) रात्री मुक्कामी येऊन त्यांनी शनिवारी दोन तास फेरफटका व तब्बल सात तास बैठका घेत काहींना कडक शब्दात तर काहींना समज देऊन कामकाजाच्या सूचना दिल्या.