शिरपूर- जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी सिनेस्टाइल कारवाई करीत ग्राहक असल्याचे भासवून बोगस कापूस बियाण्यांचा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता. २०) दुपारी दोनला महामार्गावरील जयभद्रा भुईकाट्याजवळ करण्यात आली. बियाणे विक्रीसाठी घेऊन आलेल्या संशयितांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात चार बियाणे उत्पादक कंपन्यांचाही समावेश आहे.