शिरपूर: शेकडा दहा टक्के व्याजाने देऊन त्याच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या घरात किन्नरांना पाठवून त्याची बेअब्रू केल्याच्या तक्रारीनंतर पाच अवैध सावकारांवर सोमवारी (ता. २) सहकार विभाग व पोलिसांनी छापे टाकले. त्यांच्याकडून संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.