Shirpur Market
sakal
शिरपूर: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात येथील बाजार समितीत मक्याची आवक वाढली असून, परिसरातील शेतकरी मिळेल त्या वाहनातून मका विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, मक्याचे दर अपेक्षेच्या तुलनेत कमालीचे घसरल्याने उत्पादकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.