Dhule Market Committee Election : 18 जागांसाठी 'या' तारखेला मतदान

Dhule Market Committee Election
Dhule Market Committee Electionesakal

शिरपूर (जि. धुळे) : येथील बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा सोमवारी (ता. २७) जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी केली.

३० एप्रिलला मतदान, मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या वन डे मॅचमुळे सहकार व राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. (shirpur market committee election voting for 18 seats on April 30 dhule news)

सरासरी दोन कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असलेली शिरपूर बाजार समिती तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था मानली जाते. २०१६ मध्ये या समितीवर आमदार अमरिशभाई पटेलप्रणीत पॅनलने बहुमत मिळविले.

ऑक्टोबर २०२१ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. मात्र संचालकांना मुदतवाढ देण्यात आली. प्रशासक नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर १५ फेब्रुवारीपासून जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी कार्यभार स्वीकारला.

अठरा जागांसाठी चुरस

बाजार समितीच्या संचालकपदाच्या एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सेवा सहकारी संस्था मतदारसंघात एकूण ११ जागा असून, सर्वसाधारणसाठी सात जागा आहेत. महिलांसाठी दोन, इतर मागास प्रवर्गासाठी एक, तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात चार जागा असून, सर्वासाधारणसाठी दोन जागा आहेत. अनुसूचित जाती-जमाती व आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. व्यापारी व अडते मतदारसंघात दोन, तर हमाल-मापाडी मतदारसंघात एक जागा आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Dhule Market Committee Election
SAKAL Exclusive : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात; 8 दिवसात संपूर्ण 1 दिवस पाणीपुरवठा बंद

असे आहेत मतदार

बाजार समितीच्या सेवा सहकारी मतदारसंघात ९० विविध कार्यकारी संस्थांचा समावेश असून, तेथील एकूण एक हजार ११७ मतदार मतदान करणार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात ११८ ग्रामपंचायती असून, तेथील एकूण एक हजार २०९ मतदार हक्क बजावतील. व्यापारी मतदारसंघात १५८ मतदार, तर हमाल-मापाडी मतदारसंघात ३२५ मतदार आहेत.

काँग्रेस ते भाजप प्रवास

आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभुत्व असलेले संचालक मंडळ बाजार समितीवर सत्तारूढ झाले. २०१९ मध्ये आमदार पटेल यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे बाजार समितीवरही भाजपचे वर्चस्व निर्माण झाले.

२०१६ ची निवडणूक काँग्रेसविरोधात भाजपतर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, तत्कालीन तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. त्यात भाजपचे सुकदेव भिल संचालकपदी निवडून गेले होते. आता पटेल व रंधे एकत्र असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधात कोण सक्रिय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Dhule Market Committee Election
Dhule News : मार्केटचे आरक्षण; महासभेत 4 हजार चौमी जागेचा उद्या होणार फैसला...

अर्ज दाखल करण्यास सुरवात

सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून, ३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी ५ एप्रिलला केली जाणार आहे. पात्र उमेदवारांची यादी ६ एप्रिलला प्रसिद्ध केली जाणार आहे. २० एप्रिल ही माघार घेण्याची अखेरची मुदत आहे. २१ एप्रिलला निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करून त्यांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल.

३० एप्रिलला सकाळी आठ ते दुपारी चारदरम्यान मतदान, तर सायंकाळी पाचपासून मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण केल्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून व्ही. बी. पापुलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dhule Market Committee Election
Dhule Market Committee Election : भाजप स्वबळावर लढणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com