Reels
sakal
शिरपूर: आले तुफान किती, जिद्द ना सोडली... थांबायचं नाय आता थांबायचं नाय... तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची...अशा एक ना अनेक प्रेरणादायी गीतांचे पार्श्वसंगीत, खास लिनेनचा पोशाख, डोळ्यांवर महागडा गॉगल आणि दोन्ही हात जोडलेली इच्छुकाची छबी आणि मागे बाह्या सरसावून चालणारे बिनीचे कार्यकर्ते अशी स्लो मोशनमधली रील्स सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. प्रचाराच्या या प्रभावी माध्यमामुळे यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत ‘रील्स मेकर्स’ला अच्छे दिन आले असून, तज्ज्ञ युवकांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.