Mahashivratri: निफाड- देशभर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी होत आहे. मात्र, निफाड तालुक्यातील नैताळे येथील द्राक्षे उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी अनोख्या पद्धतीने महाशिवरात्री साजरी केली आहे. द्राक्षे बागायतदार संघाने महाशिवरात्री हा द्राक्ष दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार द्राक्ष दिन व महाशिवरात्री यांचा दुग्धशर्करा योग म्हणून त्यांनी आपल्या द्राक्षबागेत द्राक्ष मण्यांपासून शिवशंकराची पिंड बनवून त्याची यथासांग पूजा अर्चा करून महाशिवरात्री साजरी केली.