पाचोरा- तालुक्यातील परधाडे येथील शेतकरी दत्तू पाटील यांच्या शेतातील वीज तारांमधून उडालेल्या ठिणगीमुळे कापून ठेवलेला दोन लाख ५० हजार रुपये किमतीचा मका व चारा जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२) घडली. दरम्यान, या नुकसानाचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.