Silver Price
sakal
जळगाव: सोने- चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या उलाढालीमुळे चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. तीच भावाची झळाळी या उद्योगाच्या मुळावर उठू लागली आहे. चांदीचे भाव सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे चांदीच्या वस्तूंना मागणी नसल्याचे चित्र आहे. चांदीच्या वस्तूंच्या विक्रीत ७० ते ७५ टकके घट झाली आहे. असे असले तरी श्रीमंत व गुंतवणूकदार चांदीची वीट, तुकडा, रिंग, काइल अशी ठोक चांदी खरेदी करीत आहेत.