Dhule News : पांझरा पात्रातून वाळूची तस्करी; महसूल विभागाची डोळेझाक

Revenue-Department Work News
Revenue-Department Work Newsesakal

पिंपळनेर : येथील पांझरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे. शनिवार व रविवार कुस्ती ग्राउंड फरशी पुलाजवळ नदीचे पाणी कमी असल्याने सहा ते सात मजुरांच्या सहाय्याने नदीपात्रातच वाळू गाळून ट्रॅक्टर व ॲपेरीक्षामध्ये भरून नेली असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबतची महसूल विभागाला खबर असूनही महसूल विभागाने याकडे सर्रास डोळे झाक केली आहे. यामुळे महसूल विभागाबाबत प्रश्न निर्माण होत आहे. (Smuggling of sand through panzara river ignored by Revenue Department dhule news)

Revenue-Department Work News
Nashik News : पुरेशा सुविधा मिळत नसल्याने चापडगाव आश्रम शाळेचे विद्यार्थी उतरले रस्त्यावर!

पांझरा नदीवर वाळू तस्कर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. नदीतील पाणी कमी झाल्याने व काही महिन्यांपासून दिवसा व रात्री नद्यांमधून वाळूची चोरी करून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असल्याची बाब काही दिवसापासून सातत्याने समोर येत आहे.

पांझरा नदीतील एकविरा माता मंदिराच्या पाठीमागे, बायपास नवापूर पुलाजवळ, कुस्ती ग्राउंड फरशी पुलाजवळ तसेच गंगेश्वर मंदिर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू तस्करीमुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. वाळूचोरीमुळे नदीची स्थिती बदलत असून, पांझरा नदीला सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Revenue-Department Work News
Nashik News : ZPच्या निधी नियोजनात अखेर आमदार कांदे यांना रस्त्यांसाठी निधी मिळाला!

बंदी असलेल्या नदीतून होत असलेल्या वाळूचोरी आणि तस्करीवर पर्यावरणप्रेमींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शनिवार व रविवारी कुस्ती ग्राउंड फरशी पुलाजवळ नदीचे पाणी कमी झाल्याने सहा ते सात मजुरांच्या सहाय्याने नदीपात्रातच वाळू गाळून ट्रॅक्टर व ॲपेरिक्षामध्ये भरून नेली असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबतची महसूल विभागाला खबर असूनदेखील महसूल विभागाने याकडे सर्रास डोळेझाक केली आहे. यामुळे महसूल विभागावर प्रश्न निर्माण होत आहे. कारवाई होत नसल्यामुळे वाळू तस्करांमध्ये कोणाची भय नसून सामान्य नागरिकांनी विचारणा केलीच तर वाळू तस्कर गुंडगिरीचा वापर करत असल्याने तक्रार करण्यास कुणी पुढे येत नसल्याची बाब समोर आली आहे.

महसूल विभागाचे दुर्लक्ष

या तस्करीवर महसूल विभागाकडून कोणतीही मोठी कारवाई न झाल्याने विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. पांझरा नदी पात्रातून तस्करांकडून आतापर्यंत नदीपात्रातून नदी खोदून शेकडो ब्रास वाळूची चोरी करण्यात आली आहे. तस्करांकडून नदीतून दिवसा प्रशासनाच्या नाकावर टीच्चून खुलेआम वाळूचोरीचे प्रकार घडताना दिसतात, असे असतानाही नदीच्या संरक्षणासाठी तस्करांविरोधात कोणतीही ठोस कारवाई महसूल प्रशासनाने केलेली नाही.

Revenue-Department Work News
Jalgaon News : 400 वर जोडप्यांच्या ‘मनोमिलना’ त महिला कक्षास यश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com