सामान्य कुटुंबातील 'स्नेहल' ते 'न्यायाधीश'...थक्क करणारा तिचा 'प्रवास'

snehal jadhav.jpg
snehal jadhav.jpg

नाशिक : महात्मा गांधींच्या 'खेडयाकडे चला' या विचारात असूनही ग्रामीण भागात जिद्द आणि चिकाटी दडलेली आहे. मुळचे पिंप्री सैय्यद, येथील रहिवासी असलेल्या लता व शंकरराव जाधव यांची कन्या स्नेहल शंकरराव जाधव हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून ( एमपीएस्सी ) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून निवड झाली आहे. तिच्या जिद्द आणि चिकाटीमुळेच ती बनली न्यायाधिश.

 तिचा प्रवास...पीलकांचा मोलाचा वाटा..

शंकर जाधव हे मुळचे सिद्ध पिंप्री सैय्यद ( जि.नाशिक ) चे असून आपला पारंपारिक शेती व्यवसाय सांभाळून मेहनत आणि तल्लख बुद्धिच्या जोरावर शंकररावांनी स्टेनो मध्ये प्राविण्य मिळवले आणि जिल्हा सत्र न्यायालयात स्टेनो म्हणून सेवा सुरू केली. आपल्या सारखीच मुलं सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाली पाहिजे अशी प्रखर ईच्छा ठेऊन त्यांनी बेटी पढाव बेटी बचाव या शासनाच्या आवाहनाचा ध्यास घेतला. विशेष म्हणजे चार मुली असूनही त्यांनी कधी कुरकुर न करता चारही मुलंच आहे. असे संस्कार केले. एक मुलगी दोन घरांना शिक्षित करील असाच कयास बांधून इतर ऐशो आरामाच्या खर्चाला लगाम घालून सकाळी पहाटे उठून शेती सांभाळून पुन्हा शासकिय नोकरीचा ताण सांभाळून मुलींना शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यामुळेच एक कन्या भाग्यश्रीला राज्य सेवेत वित्त व लेखाअधिकारी झाली तर दुसरी प्रियंका ही एमए इंग्लिश शिक्षणात प्राविण्य घेऊन जिल्हा न्यायालयात क्लार्क म्हणून सेवेत रूजू झाली. आणि तिसरी स्नेहल हीने बीएस्सी, एल.एल. एम. हिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून राज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग या पदाच्या स्पर्धा परिक्षेत राज्यात १५९ व्या क्रमांकाने यशस्वी झाली. मुलांपेक्षा मुली काकणभर सरसच असतात त्यांना प्रोत्साहन मिळणे महत्वाचे आहे.

मुलींनी चुल अन् मुल या पलीकडे जाऊन आलेल्या संधीचं सोनं करावं

मुली एकपाठी आणि प्रामाणिकअसतात. आईला घरात मदत करून शिक्षण घेतात त्यांच्यावर संस्कार होणे महत्वाचे आहे. मुलींनी चुल आणि मुल या पलीकडे जाऊन आलेल्या संधीचं सोनं कराव असे शंकरराव जाधव आणि सौ लता ताई जाधव यांचे म्हणणं आहेस्नेहलच्याा य यशाबदल माजी आमदार मंदाकिनी कदम, मविप्र चिटणीस सुनिल ढिकले, जिप सदस्य यतीन कदम, सरपंच सौ जान्हवी कदम यांनी अभिनंदन केले

मुलींच्या निर्णयाला बाजु द्यावी त्यांच्या पंखात बळ भरावे. करिअर निवडीचे स्वातंत्र्यदिल्यास त्यांची यशाची उड्डाणे उत्तुंग भरारी घेतात - वडील शंकरराव व आई लताताई जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com