Nandurbar : सफाई कामगाराच्या मुलाला शिक्षणासाठी मदत

Principal I D. Patel. while handing over financial aid for child's education to Ritesh Dodve.
Principal I D. Patel. while handing over financial aid for child's education to Ritesh Dodve. SYSTEM

शहादा (जि. नंदुरबार) : शहरातील शेठ व्ही. के. शहा विद्यामंदिर व (कै.) सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्राचार्य आय. डी. पाटील यांचा मार्गदर्शनाखाली एका सफाई कामगाराच्या मुलाला माणुसकीच्या नात्याने शिक्षणासाठी मदत केली.

दरम्यान, तालुक्यात एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या दातृत्वाच्या आदर्श कर्मचाऱ्यांनीही घेतल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. (Social commitment of employees of Shahada Vidyamandir Patil Junior College Help education of scavengers son Nandurbar News)

Principal I D. Patel. while handing over financial aid for child's education to Ritesh Dodve.
Dhule : चिमठाण्याजवळ 4 तास वाहतूक ठप्प!

समाजात आजही अनेक विद्यार्थ्यांकडे बुद्धिमत्ता आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी समाजातील दातृत्व पुढे आल्यास निश्चितच विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेच्या किरण येतो. असाच आशेच्या किरण शहरातील शेठ व्ही. के. शहा व (कै.) सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आर्थिक मदत करून दिला. येथील सफाई कामगार रितेश डोडवे यांचा मुलगा आशिष डोडवे याने या वर्षी शासकीय आयटीआयला अर्ज केला होता.

मार्क थोडे कमी असल्याने आयसीटी योजनेंतर्गत पेमेंट सीटवर नंबर लागला. मात्र, फी ५३ हजार रुपये होती. सफाई केल्यानंतर आलेल्या पैशात फक्त चरितार्थ चालत होता. मुलाचा पुढील शिक्षणासाठी पैसे नव्हते, म्हणून डोडवे परिवार चिंतित होता. ही गोष्ट सांगितल्यानंतर प्राचार्य आय डी पटेल यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना यथाशक्ती मदतीचे आवाहन केले.

कर्मचाऱ्यांनी दातृत्व दाखवत मदत गोळा केली आणि माणुसकी ओथंबून वाहिली. माझ्या नशिबी स्वच्छतेचे काम आले आहे. मुलाच्या नशिबी तरी निदान हे काम नको, त्याने शिकावे शिकून कुठेतरी नोकरी करावी, ही मनीषा डोडवे परिवाराची आता पूर्ण होईल.

Principal I D. Patel. while handing over financial aid for child's education to Ritesh Dodve.
संततधारेनंतर गोदेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ; नागरिकांना सावधानतेचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com