Electricity Bill
sakal
जळगाव: वाढत्या वीजबिलावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी लाखो रुपये खर्चून सोलर सिस्टिम बसविल्या. मात्र, अशा सोलर वापरकर्त्यांना नेहमीपेक्षा जास्त, काही वेळा दुप्पट वीजबिल आकारले जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. तसेच सोलरचे रीडिंग घेण्याचा घोळही अजून संपत नसल्याने घरांवर सोलर बसविलेले अनेक ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत. यावर ‘महावितरण’कडून गेल्या महिन्याभरापासून तक्रारी कमी झाल्या असल्याचा दावा केला आहे.