Crime
sakal
सोनगीर (ता. धुळे): उसतोडणीसाठी मजूर पुरवठा करण्यावरून पैशांच्या देण्या-घेण्यावरून वाद झाल्याने चार जणांनी एका मजुराची पत्नी व मुलाचे अपहरण केले. ही घटना दापुरी (ता. धुळे) शिवारात घडली. या प्रकरणी अपहृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.