धुळे- राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जनकल्याण यात्रा २०२५ चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम एलईडी व्हॅनमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. या जनकल्याण यात्रेचे आगमन धुळे जिल्ह्यात झाले असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.