
Sati Ahilyadevi Yatrotsav : श्री सती अहिल्यादेवी यात्रेला सुरुवात; कृषी प्रदर्शनाचे भाविकांना विशेष आकर्षण!
धुळे : बोरीसची (ता. धुळे) ग्रामदैवत श्री सती अहिल्यादेवी यात्रोत्सवाला शनिवारी (ता. २१) भक्तीमय, चैतन्यदायी वातावरणात सुरवात झाली. अनेक राज्यातील भाविकांनी गर्दी करत नवस फेडले. यात्रेत कृषी प्रदर्शनही आकर्षण ठरत आहे. (Sri sati ahilya devi yatra started Agriculture exhibition is special attraction for devotees dhule news)
जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा विद्यमान सदस्य धरती निखिल देवरे यांच्या संयोजनाने कृषी प्रदर्शन होत आहे. शेती व्यवसायासंबंधी विविध उत्पादने व घटकांबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळावी, तसेच खरेदी- विक्रीसंदर्भात प्रदर्शन होत आहे.
यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातून भाविक दाखल झाले आहेत. नवस फेडण्यासह श्री सती अहिल्यादेवी मातेच्या दर्शनासाठी महिला वर्गाची विशेष उपस्थिती आहे. यात्रेत श्री सती अहिल्यादेवी ट्रस्टतर्फे सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे असून स्वयंसेवक मदतीसाठी तत्पर आहेत. भाविकांनी जागरूक असावे, असे आवाहन ट्रस्टने केले.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
हेही वाचा: Dhule News : 57 रस्ते ‘कात’टाकणार; खासदार डॉ. सुभाष भामरेंच्या पाठपुराव्याने 40 कोटींचा निधी मंजूर!
ग्रामीण संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या तगतराव मिरवणुकीने यात्रेला सुरवात झाली. ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, उद्योजक विलास देवरे, निखिल देवरे यांनी सपत्नीक पूजन व महाआरती झाली. यात्रेत महाप्रसादाचेही वाटप झाले. यात्रोत्सवात भाविकांना सहभागाचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवरे यांनी केले.
हेही वाचा: Dhule News : योजना 154 कोटींची; तरीही जलकुंभ कोरडेच? शिवसेनेच्या ठाकरे गटाचा वार कोणावर?