Dhule News : 57 रस्ते ‘कात’टाकणार; खासदार डॉ. सुभाष भामरेंच्या पाठपुराव्याने 40 कोटींचा निधी मंजूर!

Dr.Subhash Bhamre
Dr.Subhash Bhamreesakal

धुळे : शहरातील विविध भागातील ५७ रस्ते कात टाकणार आहेत. याकामी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांती ४० कोटींचा निधी शासनाने दिला आहे. त्यांच्या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्तता केली आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत होणारे रस्ते असे (कंसात निधी):

ऐंशी फुटी रोड, स्टेशन रोडपासून ते कनोसा कॉन्व्हेंटपर्यंत डांबरीकरण (दोन कोटी), प्रभाग तीनमध्ये भावसार यांच्या घरापासून ते पंजाबराव पवार, तेथून योगेश पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण व गटार (७० लाख), प्रभाग १७ मधील शिवप्रभू कॉलनीअंतर्गत सर्व काँक्रिटीकरण व गटार (७० लाख). (40 crore funding given by government for road development through efforts of MP Dr. Subhash Bhamre dhule news)

प्रभाग १६ मधील सत्यसाईबाबा सोसायटीतंर्गत काँक्रिट गटार व डांबरीकरण (५० लाख), कस्तुरबानगरात एम. डी. पाटील यांच्या घरापासून ते सोमराज पाटील, तसेच श्री. लोंडे ते श्री. खलाणे यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग सहामधील मोराणे येथे वसंत सूर्यवंशी ते नाना तावडे यांच्या घरापर्यंत डांबरीकरण व काँक्रिट गटार (६० लाख).

मोराणेत श्रीराम मंदिर ते आरोग्य केंद्रापर्यंत काँक्रिटीकरण (४० लाख), मोराणेत आबा श्रीराम पाटील ते गुलाब पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (३० लाख), मोराणेत विनोद कुंभार ते सुनील पारधी यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (४० लाख).

प्रभाग सहामध्ये समृध्दीनगर बोर्डपासून जे. के. खैरनार यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (५० लाख), पवननगरअंतर्गत बंदिस्त गटार व काँक्रिटीकरण (दीड कोटी), जळगाव जनता कॉलनी, विठ्ठलनगरअंतर्गत बंदिस्त गटार व काँक्रिटीकरण (दोन कोटी), शंभर फुटी रस्ता, चाळीसगाव रोड ते मालेगावरोड तसेच लगतचे रस्ते व गटार (दोन कोटी).

चाळीसगाव रोडलगत भगवान अंपळकर यांच्या दुकानासमोरील गटार तयार करणे (दोन कोटी), सप्तशृंगी नगर, अंबिका नगर, छोरीया नगर, कोरके नगर, शिंदेनगर भागात बंदिस्त गटार व काँक्रिटीकरण (दोन कोटी), गोविंद अपार्टमेंट, सुगंध नगर, मिरजकर नगर, ८० गाळे, वल्लभ नगर, विश्वकर्मा नगर, स्नेह नगर भागात बंदिस्त गटार व काँक्रिटीकरण (दोन कोटी).

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Dr.Subhash Bhamre
Dhule News : योजना 154 कोटींची; तरीही जलकुंभ कोरडेच? शिवसेनेच्या ठाकरे गटाचा वार कोणावर?

नॅशनल हायवे ते विश्वकर्मा मंदिर मेन रोड (दोन कोटी), आनंदनगर, रघुवंशनगरअंतर्गत सर्व रस्ते व गटार (दीड कोटी), प्रभाग पाचमधील देवपूर भागात नकाणे रोड ते सुंदर माधव बंगल्यापर्यंत रस्ता (२५ लाख), प्रभाग पाचमधील विसपुते, जाधव यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग पाचमधील जगतापांचे घर ते नवनाथ मंदिरापर्यंत काँक्रिटीकरण (५० लाख).

प्रभाग पाचमधील प्रमोदनगरात भगवान बोरसे ते चौधरींच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग पाचमधील तुळशीरामनगरात रवी बेलपाठक यांच्या घरापासून ते अनमोल नगरपर्यंत डांबरीकरण (५० लाख), शिवप्रताप कॉलनीत विविध भागात काँक्रिटीकरण (५० लाख).

प्रभाग तीनमधील मरिमाता मंदिर ते दिनेश भामरेंच्या घरापर्यंत आणि प्रभागाअंतर्गत बोळीमध्ये काँक्रिटीकरण (२५ लाख), जामा मशीद ते मंड्या बापूंच्या घरापर्यंत, भांड पुरा येथे काँक्रिटीकरण (२५ लाख), दुर्गामाता मंदिर ते समीर वखारवाला घरापर्यंत काँक्रिटीकरण (३० लाख), शिवपार्वती कॉलनी भागात पवारांचे घर ते लेवा भवन, तेथून उमरावनगर बोर्ड, श्री. घरटेंचे घर ते ए. आर. मोरे, ए. बी. पाटील ते गोंदूर रोड, मनोरी ते अविनाश कुडेंच्या घरापर्यंत डांबरीकरण (एक कोटी).

परिमल कॉलनी भागात गजकुमार शहा ते अभियंता पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (५० लाख), आदर्श कॉलनी भागात अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण (५० लाख), काकुस्ते ते दुसाने, पवार यांच्याघरापर्यंत काँक्रिटीकरण (२५ लाख), आघाव ते डॉ. पाटील (अजिंक्य) यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (३० लाख), भरतनगर येथील शिंदे ते सांळुखेंच्या घरापर्यंत डांबरीकरण (३० लाख).

Dr.Subhash Bhamre
Agriculture News : तरूण शेतकरी यशोगाथा; शेडनेटच्या साहाय्याने 1 एकरात चक्क 35 टन उत्पादन!

प्र. पंधरामध्ये साक्री रोड से सिंधूरत्न शाळेपर्यंत रस्ता (८० लाख), उत्कर्ष कॉलनी ते सिंहस्थनगरपर्यंत रस्ता (७० लाख), प्रभाग आठमध्ये वलीपुरा गुफरान पहेलवान ते राजू भांगवाला रोड काँक्रिटीकरण (२५ लाख), माधवपुरा रफीक साबुणवाले ते फेज मदनी यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (२५ लाख), प्रभाग १९ मधील चाळीसगाव रोडपासून ते सईद पिंजारी यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (५० लाख).

मसूद हाजी यांच्या घरापासून ते याकुबभाई यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (५० लाख), रेकनगर, स्वामी नगर, उन्नतीनगर, केशरनगर, इंद्रप्रस्थनगर, जितेंद्रनगर, शिवाजीनगर येथे खडीकरण व डांबरीकरण (एक कोटी), प्रभाग एकमध्ये प्रवीण साळवे यांच्या घरापासून ते नकाणे रोडपर्यंत खडीकरण व डांबरीकरण (५० लाख), पवननगर बोर्डपासून ते अष्टविनायक नगर बोर्डपर्यंत डांबरीकरण (५० लाख).

भिवसननगर व संतोषनगरअंतर्गत काँक्रिटीकरण (५० लाख), यशोधन कॉलनी व सिंचाई कॉलनीअंतर्गत काँक्रिटीकरण (५० लाख), डॉ. सिसोदिया ते राहुल बागूल यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (५० लाख), प्रभाग १२ मध्ये कबीरगंज परिसरात आसिफ कसाई यांच्या घरापासून ते शकील टेलर यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (१५ लाख).

प्रभाग १२ मधील कबीरगंजमध्ये इम्रान आजमी यांची बेकरी ते अय्युबभाई टाईल्सवाले घरापर्यंत काँक्रिटीकरण (१५ लाख), फिरोज सर ते जावीद किराणा यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (दहा लाख), रहेमत मशिदमागे काँक्रिटीकरण (१५ लाख), प्रभाग चारमध्ये नरेश सोनार यांच्या घरापासून ते देवपूर दवाखान्यापर्यंत काँक्रिटीकरण (७० लाख).

नरेश सोनार यांच्या घरापासून ते यादव यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार (३० लाख), पंचवटी भागात बाळू खरोटे यांच्या घरापासून ते मधू महाले यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (३० लाख), पंचवटी भागात विजय चौधरी यांच्या घरापासून ते शरीफ खाटीक यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण (४० लाख), प्रभाग १८ मधील मोहाडी उपनगर भागात वालचंद बापूजीनगरअंतर्गत काँक्रिटीकरण (एक कोटी).

प्रभाग १८ मधील मोहाडी उपनगर भागातील जयशंकर कॉलनी ते रेसिडेंसी हॉटेलपर्यंत काँक्रिटीकरण व गटार (एक कोटी), मोहाडी भागातील पंडित देसले यांच्या घरापासून ते अमृत हॉटेलपर्यंत काँक्रिटीकरण व गटार (एक कोटी), प्रभाग पंधरामध्ये भावसार कॉलनी, वैभवनगर भागाअंतर्गत डांबरीकरण (एक कोटी).

Dr.Subhash Bhamre
Nashik News : शहरातील 323 बेघर निवारा केंद्रात रवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com