Nail Painting : नखचित्रकलेतून साकारली भगवद्गीता; ज्ञानेश्‍वर सोनवणे यांचे कौशल्य!

Dyaneshwar Sonwane showing the certificate of inclusion in the 'India Book of Records'.
Dyaneshwar Sonwane showing the certificate of inclusion in the 'India Book of Records'. esakal

नंदुरबार : तामसवाडी (ता. साक्री) येथील रहिवासी व सध्या जखाणे (ता. शिंदखेडा) येथील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कलाशिक्षक असलेले ज्ञानेश्वर भीमराव सोनवणे यांनी नखचित्रांच्या माध्यमातून कागदावर श्रीमद्भभगवद गीता (Srimad Bhagavad Gita) नखाने लिहून पूर्ण केली आहे. (Srimad Bhagavad Gita was completed by writing with nails on paper through nail painting by Dnyaneshwar Sonawane nandurbar news)

त्यांच्या या कामाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. श्री. सोनवणे यांनी कोरोनाकाळात आपल्या नखांच्या सहाय्याने भगवद्गगीता कागदावर साकारली. भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या एकूण ७०० आहे.

एका श्लोकात दोन ओळी त्यामुळे सर्व ओळींची संख्या एक हजार ४०० इतकी होते. रेकॉर्डच्या आयोजकांनी सर्व फोटो, टीव्हीवर आलेल्या बातम्या, व्हिडिओ, वर्तमानपत्रात आलेली कात्रणे, सर्व सखोल पडताळणी झाल्यावर रेकॉर्ड झाल्याचे कळवले. त्याचा Achievers pack नुकताच श्री. सोनवणे यांना प्राप्त झाला.

या कार्यासाठी श्री. सोनवणे याचे वडील भीमराव सोनवणे व आई (कै.) सुशीलाबाई सोनवणे यांनी नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले. १९९७ ला पिंपळनेर येथील पुंडलिक सूर्यवंशी यांच्याकडे श्री. सोनवणे यांनी सलून व्यवसायाचे धडे घेतले.

Dyaneshwar Sonwane showing the certificate of inclusion in the 'India Book of Records'.
Education News : येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होणार! पुस्तकांत दिसणार हे बदल

त्यामुळे साक्री येथील तात्या सुर्वे या नखचित्रकाराची भेट झाली आणि श्री. सोनवणे यांना ही कला शिकता आली. नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज भदाणे, सर्व संचालक मंडळानेही त्यांना सतत प्रोत्साहित केले.

"माझ्या कलेची इंडिया बुक ऑफ द रेकॉर्डने दखल घेतली. माझे रेकॉर्डमध्ये नाव समाविष्ट केले. त्यामुळे कलेची जाण असल्याचा आनंद आहे. यापुढे ‘गीनिज बुक ऑफ रेकॉर्ड’साठी ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहे." - ज्ञानेश्वर सोनवणे

Dyaneshwar Sonwane showing the certificate of inclusion in the 'India Book of Records'.
Nashik News: MVP ‘डिलिजंट बॅच'तर्फे व्यावसायिक शिक्षण; 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना विशेष वर्गासाठी प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com