वार्सा- बस थांबा असूनही देशशिरवाडे (ता. साक्री) येथे एसटी न थांबविणाऱ्या चालकाने थेट सरपंचांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला. ही घटना शुक्रवारी (ता. २) राष्ट्रीय महामार्गावर घडली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थी बसथांब्याजवळ जमले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन छेडून घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या.