Dhule Accident News : एसटी कंटेनरवर आदळली; चालकासह 12 प्रवासी जखमी

Bus accident in Gartad Shivara.
Bus accident in Gartad Shivara.esaka

धुळे : सळई नेणाऱ्या कंटेनरवर भरधाव बस आदळून झालेल्या अपघातात दहा ते बारा प्रवासी जखमी झाले. त्यातील दोन जण गंभीर आहेत. गरताड (ता. धुळे) शिवारात शुक्रवारी (ता. १६) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली. (ST hits container 12 passengers including driver injured Dhule Accident News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Bus accident in Gartad Shivara.
Nandurbar News : जिवाणूंचा शिरकाव शोधून काढणार सेन्सर; देशभरातील 13 प्राध्यापकांना पेटंट

औरंगाबाद-शिंदखेडा बस (एमएच २०, बीटी १८५४) शुक्रवारी सकाळी धुळ्याकडे येत होती. यादरम्यान गरताड शिवारात महामार्गावर पुढे सळई नेणारा कंटेनर अचानक थांबला. त्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटून भरधाव बस कंटेनरवर आदळली. त्यात बसमधील ४२ प्रवाशांपैकी दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले, तर चालक महेंद्र पाटील (वय ३५) आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात १०८ रुग्णवाहिकेची सेवा देणारे जिल्हा व्यवस्थापक जयेश पाटील, पायलट सचिन थोरात, अविनाश सूर्यवंशी, राजेंद्र पवार आणि डॉ. आवेज अहमद, डॉ. विजय भदाणे, डॉ. फैज यांनी रुग्णांना तातडीची मदत पुरविली.

जखमींमध्ये सुरेश एकनार, महेंद्र मगन पाटील, नीलम तानाजी भोसले, राज प्रकाश पाटील, राहुल पाटील, तानाजी भोसले, हिरामण पाटील, हेमंत पाटील, नयन साईराज यांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या महामार्गावर बसचा अपघात झाला होता. त्यातील जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश होता. सद्यःस्थितीत धुळे-चाळीसगाव महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.

Bus accident in Gartad Shivara.
Nashik Political News : नाशिकचा विकास नव्हे, वैयक्तिक विकासाचे मॉडेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com