Nandurbar News : पैसा वाया घालविणाऱ्या चालीरीती बंद करणार; भोई समाजाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

Akhil Maharashtra Bhoi Samaj Seva Sangh Branch Nandurbar
Akhil Maharashtra Bhoi Samaj Seva Sangh Branch Nandurbaresakal

प्रकाशा (जि. नंदुरबार) : समाजाचा शैक्षणिक स्तर उंचावणे, त्यातून नोकरी, व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून येणाऱ्या काळात मार्गदर्शन शिबिरे घेणे, वेळ व पैसा वाया घालवणाऱ्या चालीरीती बंद करणे या संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करणे आदी निर्णय शहादा येथे भोई समाजाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आले. (stop customs that waste money decision on general meeting of Bhoi community nandurbar news)

नूतन जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण वाडिले (खापर) यांची निवड झाली. अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ शाखा नंदुरबार जिल्ह्याची सर्वसाधारण सभा शहादा येथील भोईराज भवनात रविवारी झाली. जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे अध्यक्षस्थानी होते.

कार्याध्यक्ष जयवंत मोरे, कोशाध्यक्ष गणेश शिवदे, तालुकाध्यक्ष नरेंद्र वाडिले, जिल्हा युवा अध्यक्ष महेंद्र बोरदे, कार्याध्यक्ष मिलिंद वाडिले, सरचिटणीस राजा खेडकर, विवाह समिती अध्यक्ष महेंद्र साठे, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम लांबोळे, सुपडू खेडकर, धनलाल शिवदे, आर. डी. मोरे, बाबूलाल वाडिले, जयंतीलाल खेडकर, मंगा साठे, राजू तावडे, रमण ढोले, भिकचंद शिवदे आदींसह समाजाचे बंधू-भगिनी उपस्थित होते.

संत भीमा भोई, स्वामी विवेकानंद प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा सरचिटणीस प्रा. मोहन मोरे यांनी अहवालवाचन केले. या वेळी विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या अभिनव कार्यक्रमांवर विचारविनिमय करण्यात आला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Akhil Maharashtra Bhoi Samaj Seva Sangh Branch Nandurbar
Nashik News : ग्रामसेवकांनाही आता Biometric हजेरीचे बंधन; लटकलेली कामे होणार वेगाने

समाजाभिमुख कार्यात योगदान देणाऱ्या विविध समाजधुरींना समाजगौरव, समाजसारथी पुरस्कारांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुढील तीन वर्षांसाठी जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण वाडिले (रा. खापर) यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीसह विविध उपसमित्या, युवक कार्यकारिणी, महिला आघाडी, युवती संघाची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

सभेतीतील ठराव

• उर्वरित गावांतही रात्रीचा वरघोडा मिरवणूक बंद करणे.

• लग्न वेळेवर लावणे.

• दुखवट्यासाठी रुमाल-टोपी जवळच्या व मोजक्याच लोकांनी न्यावेत.

• तरुणाईसाठी नोकरी, व्यवसाय मार्गदर्शक शिबिरे घेणे.

• विधवा, परित्यक्त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रभावी प्रयत्न करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

"तीन वर्षांच्या कालखंडानंतर समाजगंगेने पुनश्च आपणास या पदावर सेवेची संधी दिली. तिचे सोने करणार असून, सर्वांच्या सहकार्याने समाजोन्नती व उत्कर्षासाठीची आपली कार्यप्रणालीला पुन्हा गती देणार." -लक्ष्मण वाडिले, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष

Akhil Maharashtra Bhoi Samaj Seva Sangh Branch Nandurbar
तरुणांनो, पोलिस भरतीची जोरदार करा तयारी! १२ डिसेंबरला मैदानी; जानेवारीत लेखी परीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com