Dhule News : मोकाट कुत्रे निर्बीजीकरणात पुन्हा खोडा! प्राणिमित्र संघटनेकडून आक्षेप

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी निर्बीजीकरणाचा पर्याय पुढे आला. या पर्यायावर काम सुरू झाल्यानंतर अडथळ्यांची मालिका सुरू झाली. हे अडथळे कसेतरी पार करत काम सुरू झाले खरे पण पुन्हा नव्याने अडथळा उभा राहिला आहे.

प्राणिमित्र संघटनेने या कामावर पुन्हा आक्षेप घेतल्याने या काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा हे काम बंद पडले आहे. यातून तोडग्यासाठी महापालिकेत बुधवारी (ता. १२) बैठक झाली खरी पण त्यातूनही काही ठोस निर्णय पुढे आला नाही.

त्यामुळे या विषयावर १८ एप्रिलला पुन्हा बैठक होणार आहे. (Stray dogs sterilization stop Objection from Animal Friends Association Dhule News)

शहरातील मोकाट, भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने धुळेकर हैराण आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येतून मार्ग निघालेला नाही. मोकाट कुत्रे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच चावा घेऊन जखमी करतात.

अनेक जणांना गंभीररीत्या जखमी केले असल्याने त्यांना उपचार घेणे भाग पडते. या कुत्र्यांमुळे काही जणांचा तर जीव गेल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, आंदोलने झाली. या सर्व घडामोडीनंतर कुत्रे निर्बीजीकरणाचा पर्याय पुढे आला.

कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले तर किमान पुढील काही महिन्यात कुत्र्यांची संख्या कमी होऊन या समस्येला लगाम घालता येईल असा यामागे उद्देश आहे. मात्र, कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम देण्यासाठी निविदा काढणे, ती फायनल करणे, मंजुरी घेणे या सर्व प्रक्रियेतच अनेक महिने गेले.

त्यानंतर जयपूर येथील एका संस्थेला हे काम देण्यात आले. या संस्थेलाही प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मोठी जुळवाजुळव करावी लागली. अखेर साधारण आठ-दहा दिवसांपूर्वी कुत्रे निर्बीजीकरणाचे काम सुरू झाले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Dhule Municipal Corporation
Nashik News : लिलाव न पुकारल्याने शेतकऱ्याने फेकले कांदे!

संस्थेकडून पुन्हा आक्षेप

दरम्यान, प्राणिमित्र संघटनेकडून या कामावर पुन्हा आक्षेप घेण्यात आला आहे. त्याबाबत तक्रार झाल्याने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे हे काम काही दिवसांतच पुन्हा बंद पडले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १२) सायंकाळी महापालिकेत बैठक झाली.

आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणिमित्र संघटनेचे प्रतिनिधी, कंत्राटदार संस्थेचे प्रतिनिधी, स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

बैठकीत प्राणिमित्र संघटनेच्या प्रतिनिधींकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम नियमानुसार होत नसल्याच्या अनुषंगाने मुद्दे उपस्थित झाले. यात निर्दयपणे कुत्रे पकडले जात असल्याचेही सांगण्यात आले. शिवाय संबंधित संस्थेकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही, विविध संस्थांचे सर्टिफिकेट नाही अशा तक्रारी करण्यात आल्या. कंत्राटदार संस्थेकडून त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न झाला.

कुत्रे पकडताना काही जण व्हिडिओ रेकॉर्ड करतात, तो कशा पद्धतीने, कोणत्या अँगलने केला जातो यावरून काही निष्कर्ष काढले जातात, त्यावरून तक्रारी जातात. मात्र, ते चुकीचे आहे. आमच्याकडे अनुभवी मनुष्यबळ आहे असा दावा केला.

पुन्हा होणार बैठक

दरम्यान, या बैठकीत दावे-प्रतिदावे, आरोप, तक्रारी झाल्या. चर्चेअंती मात्र ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे या विषयावर पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. १८ एप्रिलला ही बैठक होईल. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा विषय पुन्हा मागे पडल्याचे दिसते.

Dhule Municipal Corporation
Birsa Munda Kranti Yojana : आदिवासी शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान! लाभ घेण्याचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com