Dhule News : जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी!

haldi kunku
haldi kunkuesakal

विखरण (जि. धुळे) : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी’ या म्हणीप्रमाणे महिलांनी चूल आणि मूल यापर्यंत न राहता आता बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे विखरण ग्रामपंचायत व गावातील सहाय्यता बचत गटातर्फे झालेल्या हळदी-कुंकू व स्त्रीशक्तीचा जागर कार्यक्रमात विखरण जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा धुळे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुसुमताई निकम यांनी सांगितले. (Stree Shakti Jagar was organized by Self Help Savings Group Gram Panchayat by organizing haldi kunku programme dhule news)

येथील स्वयंसहायता बचतगट व ग्रामपंचायत यांच्यातर्फे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला.

सौ. निकम म्हणाल्या, की महिलांनी घरातील पुरुषावर अवलंबून न राहता बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येऊन स्वयंरोजगार उभारावा. त्यात लहान-मोठे उद्योग उभारून द्वारपोच मार्केटिंग करावे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्जपुरवठा होतो. यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावता येतो.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

haldi kunku
Dhule News : दिव्यांगांना 5 टक्के निधी तत्काळ वाटप करा!

या वेळी सरपंच अनिता पवार, उपसरपंच वदंना साळुंखे, सदस्या मनीषा गिरासे, रंजनकोर गिरासे, प्रतिभा साळुंके, कल्पना अहिरे, केवळबाई पाटील यांनी स्वागत करून भेटवस्तू दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्या पाटील, संगीता गिरासे, ज्योत्स्ना पवार, प्रतिभा साळुंखे, चारुशीला पाटील यांनी प्रयत्न केले. ग्रामसेवक महेंद्र शिंदे यांनी ग्रामनिधीतून भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या.

haldi kunku
State Level Kho-Kho Tournament : नाशिकच्या मुलींनी घडविला इतिहास!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com