Dhule News : पैशांच्या वसुलीसाठी छळ केल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vihshwajeet Rathod

Dhule News : पैशांच्या वसुलीसाठी छळ केल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

शिरपूर (जि.धुळे) : विद्यार्थ्याला व्याजाने पैसे देऊन वसुलीसाठी छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून शहरातील एकाच कुटुंबातील तीन जणांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील विश्वजित विनोद राठोड (वय १७) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने २६ जानेवारीला सायंकाळी सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह २७ जानेवारीला हाती लागला. (Student commits suicide due to torture for recovery of money Dhule News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अवैध सावकारीतून झालेल्या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती. थाळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. विश्वजितचे वडील विनोद राठोड बीड जिल्ह्यात शिक्षक आहेत. त्यांनी विश्वजितचा अंत्यविधी व अन्य धार्मिक संस्कार आटोपून थाळनेर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

संशयित भाग्येश शेखर भावसार, शेखर ऊर्फ विश्वास भावसार व भाग्येशची आई (तिघे रा. सुयश हॉस्पिटलमागे, करवंद नाका, शिरपूर) यांच्याकडून विश्वजितने १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. संशयितांनी त्या रकमेच्या व्याजावर व्याज लावले होते. त्यामुळे मोठी रक्कम विश्वजितकडे येणे बाकी होती.

ती रक्कम व्याजासह परत करावी अशा कारणावरून तिघेही त्याला धमकावत होते. त्यांच्याकडून होणाऱ्या छळामुळे विश्वजितने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ए. एस. आगरकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuledeathshirpur