Dhule News : अक्कलपाडा डावा कालव्याचे पाणी शिरले शेतात

water in farm
water in farmesakal

कापडणे (जि. धुळे) : खंडलाय व बांबुर्ले प्र. नेर (ता. धुळे) शिवारातील काही शेतांमध्ये अक्कलपाडा डाव्या कालव्याचे पाणी शिरले. यामुळे रब्बी हंगामाचे (Season) नुकसान झाले आहे.

पाटचारीचे पाणी तत्काळ कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला दूरध्वनी केला, पण रिसिव्ह न केल्याने, शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त झाला. (Akkalpada left canal water entered some farms in Shivara This has damaged the rabi season Dhule news)

उशिरापर्यंत हे पाणी सुरू होते. पाटचारी फुटल्यास शेती वाहून जाईल, तर जवळच असलेल्या आदिवासी वस्तीत पाणी शिरून नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

धुळे तालुक्यासाठी अक्कलपाडा प्रकल्प खूपच महत्त्वपूर्ण आहे. तालुका हरित करण्यासाठी अक्कलपाडा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सध्या रब्बीचे आवर्तन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले असल्याचे सांगितले जाते.

अधिकच्या पाण्यामुळे खंडलाय व बांबुर्ले शिवारात पाटचारी तुडुंब भरून वाहतेय. काही ठिकाणी ओव्हरफ्लो झाल्याने शेतात पाणी शिरले. यात शेतकरी काशीनाथ किरण पाटील, नवल हालोर, गंगाबाई बैरागी, भटू दोधा भिल, रामा भिल आदी काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे नवल हालोर यांनी सांगितले.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

water in farm
Republic Day : भारतीय प्रजासत्ताकाचा दुबईत डंका!

काशीनाथ पाटील यांच्या गट क्रमांक ऐंशीमध्ये पाणी शिरले. चार एकरपैकी दोन एकर कांद्याचे नुकसान झाले. पावसाळ्याच्या उत्तरार्धातही कापसाचे नुकसान झाले होते. वेळोवेळी निवेदन देऊनही पाटचारीची दुरुस्ती होत नसल्याने पाटील हताश झाले. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, पाटचारीपासून जवळच आदिवासी वस्तीही आहे. चारी फुटल्यास वस्तीत पाणी शिरून नुकसानीची शक्यता नाकारता येणार नाही. पाटबंधारे विभागाने तत्काळ लक्ष घालणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

"पाटबंधारे विभागाने कमकुवत ठिकाणी कॅनॉलला काँक्रिटीकरण करून द्यावे, म्हणजे फुटण्याची भीती राहणार नाही. पिकांचे नुकसान होणार नाही." -नवल पाटील, खंडलाय

water in farm
Nashik Air Service : Indigoतर्फे 15 मार्चपासून गोवा, अहमदाबाद, नागपूरला रोज उड्डाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com