Nandurbar News : ‘त्यांनी’ परत केली सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पर्स; प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक

While honoring the students, Principal Mahendra More etc.
While honoring the students, Principal Mahendra More etc.esakal

Nandurbar News : विद्यार्थ्यांना शालेय जीवनात चांगले संस्कार असणे आवश्यक आहे. चांगले संस्कार राहिल्यास आई-वडिलांसह शिक्षकांना आपल्या चांगल्या कार्याची एक प्रकारे पावती मिळते. अशाच एका विद्यार्थ्याने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असल्याच्या प्रकार घडला. (student returned purse containing gold and silver ornaments nandurbar news)

शहादा येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करताना सापडलेली पर्स सोने व चांदीच्या दागिन्यांसह महिलेला प्रामाणिकपणे परत केल्याने विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेल्टी (ता. शहादा) येथील कार्तिक सावळे व निरंजन अहिरराव हे शहादा येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत. रोज एसटी बसने ये-जा करतात. नेहमीप्रमाणे १९ ऑक्टोबरला प्रवास करीत असताना शहादा येथे पोचल्यावर बसमधून उतरत असताना बाकावर एका महिलेची पर्स सापडली.

संबंधित दोघा विद्यार्थ्यांनी बसमध्ये विचारणा केली, मात्र कोणीही मिळून आले नाही. त्यांनी पर्स उघडली असता सोन्याची मंगल पोत व चांदीचे जोडवे तसेच एटीएम व आधारकार्डदेखील होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कुशाग्रबुद्धीने आधारकार्डवर असलेला मोबाईल क्रमांकाने महिलेशी संपर्क साधला असता स्नेहल खर्डे (रा. तुळाजा, ता. तळोदा) येथील असल्याचे निष्पन्न झाले.

While honoring the students, Principal Mahendra More etc.
Nandurbar News : वाहनधारकांनीच काढला मुहूर्त! वाहतुकीस बंद पुलावरून वाहने सुसाट

विद्यार्थ्यांनी महिलेला पर्सबाबत विचारणा केल्यावर तिला मोठा आनंद झाला. आपली पर्स व त्यातील सोन्या-चांदीचे दागिने मिळाल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक करत होती. विद्यार्थ्यांनी महिलेच्या मावशीकडे सापडलेली पर्स सुपूर्द केली. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शालेय प्रशासनातर्फे नुकताच कार्तिक साळवे व निरंजन अहिरराव या दोन्ही विद्यार्थ्यांचा प्राचार्य महेंद्र मोरे यांच्या हस्ते शाल व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. या वेळी उपमुख्याध्यापक जे. एम. पाटील, उपप्राचार्य जे. बी. पवार व शिक्षक उपस्थित होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभातदेखील या दोन्ही विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार असल्याचे सांगितले.

While honoring the students, Principal Mahendra More etc.
Nandurbar Agriculture News : मोझॅकमुळे उभ्या पपईवर फिरविला रोटव्हेटर; शेतकऱ्याचा लाखो रुपयांचा खर्च वाया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com