Success Story : वृत्तपत्र, भाजीपाला विक्रेत्याची यशाला गवसणी! राहुलचे चार महिन्यांत तब्बल 3 सिलेक्शन

success story Appointment of Rahul Suryavanshi as Assistant Engineer Class II of Mahagenco dhule news
success story Appointment of Rahul Suryavanshi as Assistant Engineer Class II of Mahagenco dhule newsesakal

Success Story : निश्चित ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट मनात ठेवले तर अशक्य गोष्ट ही शक्य होत असते अन् ते सिद्ध केले आहे फागणे (ता. धुळे) येथील राहुल रवींद्र सूर्यवंशी याने. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याची महाजेनकोच्या सहाय्यक अभियंता (क्लास-टू)पदी नियुक्ती होऊन त्याने इतरांना आदर्श घालून दिला आहे.

राहुल सूर्यवंशी याचे चार महिन्यांत हे तिसरे सिलेक्शन आहे. पहिले सिलेक्शन बीएमसी (मुंबई) येथे, दुसरे सिलेक्शन मुंबई पोलिस, तिसरे सिलेक्शन सहाय्यक अभियंता (क्लास-२)पदी झाले.

त्याचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर झाला आहे. दोन वर्षांचा असतानाच वडील वारले. कालांतराने तो १४ वर्षांचा असताना आईनेही जग सोडले. (success story Appointment of Rahul Suryavanshi as Assistant Engineer Class II of Mahagenco dhule news)

मोठी बहीण अश्विनी, भाऊ रूपेश व तो अशा तीनच व्यक्ती कुटुंबात राहिल्या. तिन्ही भावंडे पोरकी झाली. परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने नातेवाईकही संपर्क करीत नव्हते. सकाळी व सायंकाळी घरात चूल कशी पेटेल याची भ्रांत तिघांना वाटत असे. राहुलने पटेडेल ते काम करून उदरनिर्वाह सुरू केला.

घरोघरी वृत्तपत्रवाटप करून, भाजीपाला विकून व भाऊ रूपेश रोजंदारीने कापसाच्या गाड्या भरून वीतभर पोटासाठी भटकंती करून उदरनिर्वाह करून शाळा शिकू लागले. अशातच राहुलने गावातीलच सी. एस. बाफना हायस्कूलमध्ये शिक्षण घेत दहावीला चांगले मार्क्स मिळवून धुळे येथे गव्हर्न्मेंट डिम्लोमा करून जगळगाव येथे इंजिनिअरिंग पूर्ण केले. खासगी कंपनीत जॉब करून एम.टेक.पर्यंत पोचत परीक्षा देत गेला.

बुद्धिमत्तेला व निस्सीम कष्टाला नशिबाने साथ दिली. तब्बल एक नाही, दोन नाही तर त्याचे तिसरे सिलेक्शन क्लास टू पदी होऊन खडतर परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घातली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

success story Appointment of Rahul Suryavanshi as Assistant Engineer Class II of Mahagenco dhule news
Success Story : शेतकरी कन्येची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! बागलाण तालुक्यातील पहिली मुलगी...

हा निकाल ऐकून ग्रामस्थांनी व मित्रांनी वाजतगाजत गावभर मिरवणूक काढत भव्य सत्कार केला. त्याचे सर्वपक्षीय व सर्वच स्तरांतून अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. त्याने क्लास वन होण्याचे स्वप्न असल्याचे बोलून दाखविले.

"आई-वडिलांनी आम्ही लहान असतानाच जग सोडले. आईने पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याने नातेवाइकांनीही संपर्क तोडला. सहारा कुणाचाही राहिला नाही. कुटुंबात तिन्ही भावंडांना भ्रांत होती वीतभर पोट भरण्याची. भाऊ सेंट्रिंग काम व कापसाच्या गाड्या भरायचा. मी वृत्तपत्र व भाजीपाला विकून अभ्यास करायचो.

मोठ्या बहिणीने आईचे प्रेम देऊन वाढविले. अशा खडतर जीवनप्रवासात शिक्षण मात्र सोडले नाही. शेवटी यश मिळाले. खूप आनंद झाला. यश पाहण्यासाठी आई हवी होती. मनात निश्चित ध्येय, कष्ट व संघर्ष करीत राहिल्याने यशश्री निश्चितच गळ्यात माळ घालते." -राहुल सूर्यवंशी

success story Appointment of Rahul Suryavanshi as Assistant Engineer Class II of Mahagenco dhule news
Success Story: जिद्द, चिकाटीच्या जोरावर जगदीशची यशाला गवसणी! पहिल्याच प्रयत्नात कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com