Sunny Salve Case : तपास अधिकाऱ्यांची सरतपासणी पूर्ण; 27 मार्चला उलटतपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

Sunny Salve Case : तपास अधिकाऱ्यांची सरतपासणी पूर्ण; 27 मार्चला उलटतपासणी

धुळे : शहरातील देवपूर भागातील चंदननगर येथील रहिवासी सनी साळवे खून (Murder) खटल्यात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांची साक्ष पूर्ण झाली.

२७ मार्चपासून आरोपींच्या वकिलांकडून श्री. हिरे यांची उलटतपासणी सुरू होणार आहे. (sunny salve case cross examination of Hire by lawyers of accused will begin from March 27 dhule news)

बुधवारी (ता. १५) तपास अधिकारी हिरे यांनी पहिल्या सत्रात सलग दोन तास व दुसऱ्या सत्रात ४५ मिनिटे न्यायालयासमोर साक्ष दिली. त्यात आरोपींनी खुनी हल्ल्यात वापरलेले कपडे, हत्यारे आदी आरोपींनी स्वतः तपास अधिकारी यांच्याकडे दिली.

त्यानंतर हत्यारे व कपड्यांचा पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. कपडे व शस्त्र तसेच घटनेत वापरलेले हत्यार जप्त केल्याचे साक्षीदरम्यान तपास अधिकारी यांनी सांगितले. तसेच तपासकामात घेतलेले सरकारी पंच, रीतसर पत्रव्यवहार, घटनास्थळी भेट दिल्यानंतर तेथून घेतलेले रक्ताचे नमुने, यासाठी प्रयोगशाळा नाशिक व कलिना येथे केलेला पत्रव्यवहार, पाठविलेले रक्ताचे नमुने आदींबाबतची माहिती श्री. हिरे यांनी दिली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांचा न्यायालयाने घेतलेला १६४ चा जबाब व त्यासाठी केलेला पत्रव्यवहार आदी बाबतीतही कोर्टाला सांगितले. तपासकामी जप्त केलेला मुद्देमाल, न्यायालयात हजर आरोपीदेखील श्री. हिरे यांनी ओळखले.

तपास अधिकारी यांची सरतपासणी पूर्ण झाली असून, २७ मार्चपासून आरोपींचे वकील उलटतपासणी घेतील. न्या. एम. जी. चव्हाण यांच्या समोर या खटल्याचे कामकाज सुरू आहे. विशेष सरकारी वकील श्‍यामकांत पाटील काम पाहत आहेत, तर ॲड. विशाल साळवे त्यांना सहकार्य करत आहेत.

टॅग्स :Dhulecrimemurder