Maratha Reservation : कोर्टात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल : सूरज चव्हाण

Maratha Reservation : कोर्टात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल : सूरज चव्हाण

Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा युवक काँग्रेसने निषेध केला आहे. कोर्टात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार हेच सोडवतील, असा जनतेला विश्वास असल्याचा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठक झाली. नंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की २०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. (Suraj Chavan statement Maratha community will get reservation that survives in court dhule news)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर पदाधिकाऱ्यांना नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली. शहरासाठी कुणाल पवार, तर ग्रामीणची जबाबदारी सुमीत पवार, आशिष अहिरे यांच्यावर आहे. याअनुषंगाने राष्ट्रवादीची वाटचाल कशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा घेणे, संघटन मजबुतीकरणासाठी आढावा दौऱ्यावर आहे.

राज्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असली, तरी एक पक्ष म्हणून आम्ही सरकारकडे राज्य दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करू. तरुणांच्या हाताला काम मिळविण्यासाठी लवकरच रोजगार मेळावा होईल. आगामी निवडणुकीत कोणती जागा कोणी लढवावी, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maratha Reservation : कोर्टात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल : सूरज चव्हाण
Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी-सुविधा देणार; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

ज्यांच्याकडे शहरातील राष्ट्रवादी भवनाची कागदपत्रे असतील, त्यांच्याकडे भवनाचा ताबा आपोआपच राहील, अशी पुष्टी श्री. चव्हाण यांनी जोडली. राज्यपातळीवर आमदार, खासदार निवडणुकीत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकतर तरुणांना तिकीट मिळावे, यासाठी आग्रह राहील.

आंदोलनांपेक्षा मंत्रालयातून प्रश्न सोडविण्यावर भर आहे. धुळ्याचा विकास ही राष्ट्रवादीची भूमिका आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले. अर्जुन टिळे, किरण शिंदे, सारांश भावसार, किरण पाटील, ज्ञानेश्वर भामरे, इर्शाद जहागीरदार, पोपटराव सोनवणे, कैलास चौधरी, सत्यजित शिसोदे, कुणाल पवार, सुमीत पवार, आकाश शिंदे उपस्थित होते.

Maratha Reservation : कोर्टात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल : सूरज चव्हाण
Maratha Reservation: जरांगेंचं शिष्टमंडळ- CM बैठक संपली; चर्चेनंतर शिंदेंचं सूचक विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com