Dhule News: धुळ्यात मनपा यंत्रणेकडून मराठा समाजाचे सर्वेक्षण; साडेपाचशेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

या कामाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

धुळे : राज्यातील मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सर्वेक्षणाच्या कामासाठी धुळे महापालिकेच्या पाचशेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दरम्यान, या कामाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. (Survey of Maratha Community by Municipal Corporation in Dhule Appointment of 550 officers and employees News)

राज्य मंत्रिमंडळाने ३१ ऑक्टोबर २०२३ ला घेतलेल्या निर्णयानुसार मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याबाबत कळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम काटेकोरपणे, युद्धपातळीवर व विहित कालावधीत अर्थात सात दिवसांत करण्याचे आदेश आहेत.

या पार्श्वभूमीवर यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. धुळे शहरातील सर्वेक्षण कामासाठी धुळे महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

यासाठी धुळे महापालिकेच्या आयुक्त, प्रशासक तथा नोडल अधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी मागील दोन दिवसांत अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामाच्या अनुषंगाने निर्देश दिले. यासाठी अधिकाऱ्यांना कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले आहे.

पाचशेवर अधिकारी-कर्मचारी

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्याच्या अनुषंगाने धुळे शहरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या या सर्वेक्षणासाठी धुळे महापालिका स्तरावरून दोन उपायुक्त दर्जाचे मास्टर ट्रेनर, १९ वॉर्ड अधिकारी, सुमारे ४५० प्रगणक, ३० पर्यवेक्षक तसेच इतर सहाय्यक यंत्रणेची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वेक्षणाचे हे काम मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने सर्व नियुक्त प्रगणक, पर्यवेक्षकांना मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने विविध अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे.

लवकरच हे प्रशिक्षण घेण्यात येणार असून, त्यादृष्टीन तयारी सुरू आहे. धुळे शहरातील १९ प्रभागांसाठी हे नियोजन करण्यात आले आहे. प्रभागनिहाय नकाशा तयार करणे, चतुः सीमा निश्‍चित करणे व आनुषंगिक कामांचे निर्देश देण्यात आले आहेत.

Dhule Municipal Corporation
Nashik: राज्यात 3 वर्षांत महाकार्गोला 132.55 कोटींचे उत्पन्न! व्यापारी व शेतकऱ्यांचा खात्रीची सेवा असल्याने वाढला कल

सुट्याही केल्या रद्द

सर्वेक्षणाच्या अनुषंगाने धुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द केल्या आहेत.

पुढील आदेश होईपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात येत असून, आपल्या नियंत्रणातील कुठल्याही कर्मचाऱ्याला दीर्घ व किरकोळ रजा देण्यात येऊ नयेत. तसेच आपण व आपल्या नियंत्रणातील कर्मचारी यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये.

सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत सर्व शासकीय सुट्या (शासकीय/शनिवार, रविवार) रद्द करण्यात येत असून, कार्यालय सुरू ठेवावे. जे विभागप्रमुख, कर्मचारी गैरहजर, रजेवर गेल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सर्व अधिकारी, विभागप्रमुखांना आदेशातून दिला आहे.

विशेष कक्ष स्थापन

सर्वेक्षणाचे काम सुलभ व जलदगतीने व्हावे यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आला आहे. सर्वेक्षणाच्या कामात बेजबाबदारपणा, हलगर्जी केल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News: पाठपुराव्यामुळेच 276 कोटींतून राष्ट्रीय महामार्गाचे काम : खासदार डॉ. भामरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com