Nashik: राज्यात 3 वर्षांत महाकार्गोला 132.55 कोटींचे उत्पन्न! व्यापारी व शेतकऱ्यांचा खात्रीची सेवा असल्याने वाढला कल

राज्यात खासगी मालवाहतुकीच्या स्पर्धेत एसटी महामंडळाने २१ मे २०२० ला महाकार्गो (मालवाहतूक) सुरू केली
Mahacargo
Mahacargoesakal

मालेगाव : राज्यात खासगी मालवाहतुकीच्या स्पर्धेत एसटी महामंडळाने २१ मे २०२० ला महाकार्गो (मालवाहतूक) सुरू केली. अल्प दरात ट्रान्स्पोर्ट व्यवसायाला सुरवात केल्याने महामंडळाकडे व्यापारी व शेतकऱ्यांचा खात्रीची सेवा असल्याने कल वाढला आहे.

राज्यात महाकार्गोचे ७८५ वाहने असून, ३१ विभागांत अहमदनगर जिल्ह्यात सर्वांत जास्त वाहने आहेत. तीन वर्षांत महाकार्गोला या सेवेतून १३२.५५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. (Income of 132 half crores to Maha Cargo in 3 years in state Due to assured service of traders and farmers trend increased Nashik)

एसटी महामंडळाने महाकार्गो ही वाहने एसटी बसला जोड देण्यासाठी सुरू केली. महाकार्गोमुळे एसटीच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली. एसटीला विविध सवलतींमुळे अनेक नागरिक एसटीशिवाय प्रवास करीत नाही.

महाकार्गोची मालवाहतूकही अन्य मालवाहतूक सेवेच्या तुलनेत कमी दराची आहे. इतर ट्रान्स्पोर्टच्या तुलनेत कमी किमतीत व्यापाऱ्यांना महाकार्गो सेवा देत असल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या हक्काची झाली.

अगदी खेड्यापाड्यांत पोहोचणाऱ्या बसमुळे अल्प वेळेत शेतकऱ्यांच्या बांधावर महाकार्गो दिसत आहे. शेतकरी बांधव मका, सोयाबीन, पशुखाद्य, गहू, कांदा, रोपवाटिका, महाबीज, पाण्याच्या बॉटल, शेती कुंपणासाठी लागणारी वायर, रांगोळी यांसह विविध मालाची वाहतूक करीत आहे.

वेळेत, सुखरूप व खात्रीने माल वाहतूक होत असल्याने महाकार्गोची विश्वासार्हता वाढली आहे. राज्यात ३१ विभागांत तीन वर्षांमध्ये महाकार्गोने एसटी महामंडळाला १३२.५५ कोटींचे उत्पन्न मिळवून दिले आहे. महाकार्गोला सोलापूर विभागाने सर्वाधिक उत्पन्न मिळवून दिले आहे.

Mahacargo
Makar Sankranti 2024: यंदा तीळगुळाचे भाव वाढणार! राज्यात झालेल्या अल्पवृष्टीमुळे तिळाच्या उत्पादनात घट

...अशी आहे महाकार्गोची सेवा

महाकार्गो डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याने अनेक शेतकरी याला पसंती देत आहेत. एकावेळी महाकार्गोमध्ये दहा टन माल बसतो. वाहन चालविण्यासाठी दोन चालक असतात.

एक ते शंभर किलोमीटरपर्यंत पाच हजार सातशे रुपये दर आकारले जात असून, दोनशे किलोमीटरच्या पुढे गेल्यास ५५ रुपये प्रतिकिलो मीटर दराने आकारणी होते. गेल्या महिन्यात नाशिक विभागात मालेगाव आगारातील महाकार्गोने ५२ फेऱ्या केल्या.

विभागात मालेगाव प्रथम आले. इतर वाहने दहा टन मालवाहतुकीसाठी सात ते साडेसात हजार रुपये घेत असल्याचे वाहतुकीचे कक्ष नियंत्रक महेंद्र पाटील यांनी सांगितले.

"अगदी कमी किमतीत सेवा मिळत असल्याने महाकार्गो सुरू झाल्यापासून आम्ही शेतीच्या कुंपणासाठी लागणारे वायर महाकार्गोने पाठवीत आहे. सर्व्हिस व माल वेळेत पोहोचते. तसेच पूर्ण बस ही पॅक असल्याने मालही खराब होत नाही."

- प्रवीण निकम, गोविंद वायर इंडस्ट्रीजचे संचालक, दाभाडी, ता. मालेगाव

Mahacargo
Onion Export Ban: कांदा निर्यातबंदीने शेतकऱ्यांचे 500 कोटींचे नुकसान! दरात सरासरी 1500 रुपयांची घसरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com