Dhule News : थातुरमातुर दंडाला ठेकेदार घाबरेनात! घंटागाड्या बंद ठेवल्याने स्वयंभूला 1 लाख 26 हजार दंड

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : शहरातील घनकचरा संकलनाचे काम एक दिवस बंद ठेवल्याने कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टला महापालिका प्रशासनाने एक लाख २६ हजार रुपये दंड ठोठावला.

दरम्यान, संस्थेला केलेला दंडामुळे कामात सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम भरून संस्था मोकळ्या होतात. त्यापेक्षा कितीतरी पटीने बिल वसूल केले जाते. त्यामुळे दंडाला या संस्था आता घाबरत नाहीत अशी स्थिती पाहायला मिळते.

शहरातील घरस्तरावरील घनकचरा संकलनाचे काम महापालिकेने स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या संस्थेला दिले आहे. साधारण दीड वर्षापासून संस्था धुळे शहरात काम करत आहे. (Swayambhu fined 1 lakh 26 thousand for keeping garbage vehicle closed dhule news)

त्यापूर्वी वॉटरग्रेस कंपनी हे काम करत होती. वॉटरग्रेसला महापालिकेने बाद केल्यानंतर हे काम स्वयंभू ट्रान्स्पोर्टला देण्यात आले आहे.

मात्र, पुन्हा एकदा या संस्थेबाबत तक्रारी होत आहेत. मागील स्थायी समितीच्या सभेत तर सभापतींच्या पत्रानुसार संस्थेच्या कामाबाबत निर्णय घेण्याचा विषय घेण्यात आला होता. त्यावर सदस्य सुनील बैसाणे यांनी स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनीबाबत गंभीर तक्रारी केल्या होत्या. सभापतींनी पुढच्या सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले खरे पण तशी कार्यवाही झाली नाही. हा विषय पुढील सभेत घेण्याचे संकेत आहेत.

हा सोपस्कार होऊन त्यातून नेमके काय पुढे येणार याकडे लक्ष असेल पण शहरातील कचरा संकलनप्रश्‍नी ज्या-ज्या संस्थांची नियुक्ती होते त्यांच्या कामाबाबत सुरवातीपासूनच तक्रारींचा पाढा सुरू होतो. नागरिकांच्या तक्रारींचा संदर्भ घेत नगरसेवक, पदाधिकारी तक्रारींसह संबंधित संस्थेवर गंभीर आरोप करतात.

नंतर त्या आरोपांचे काय होते हे कुणालाही समजत नाही. प्रशासनाकडूनही या तक्रारी, आरोपांबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नाही. परिणामी काही दिवस, काही महिन्यांनी पुन्हा तशीच स्थिती उद्‍भवते. संबंधित संस्था अशा आरोपांना आता भीक घालत नाहीत शिवाय प्रशासनाकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईलादेखील या संस्था घाबरत नाहीत अशी स्थिती पाहायला मिळते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule News: धुळेकरांसाठी E Bus; मनपासाठी ‘पेट्रोलपंप’चे स्वप्न! महासभेपुढे विषय

स्वयंभूला पुन्हा दंड

कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टने ७ सप्टेंबर २०२३ ला घरस्तरावरील घनकचरा संकलनाचे काम पूर्णपणे बंद ठेवले. तसा अहवाल महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी वरिष्ठांकडे सादर केला. या अहवालावरून करारनाम्यातील अटी-शर्तीनुसार प्रतिघंटागाडी दोन हजार रुपये याप्रमाणे ६३ घंटागाड्या बंद ठेवल्याने स्वयंभू ट्रान्स्पोर्टला एकूण एक लाख २६ हजार रुपये दंड करण्यात आला.

दंडाची ही रक्कम ऑगस्ट-२०२३ च्या बिलातून कपात करण्यात येईल, असे प्रशासनाने स्वयंभू ट्रान्स्पोर्टला नोटिशीद्वारे कळविले आहे. प्रशासनाकडून अशी दंडात्मक कारवाई नियमितपणे होत असते. या कारवाईचा संबंधित संस्थांना किती फरक पडतो, कारवाईनंतर कामात सुधारण होते का, असा प्रश्‍न आहे.

अटी-शर्तीच थातुरमातुर

घनकचरा संकलन असो, पथदीपांचा प्रश्‍न असो की महापालिकेच्या माध्यमातून होणारी इतर विविध कामे. संबंधित संस्था, ठेकेदारावर अटी-शर्तींचा भंग केला म्हणून महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मुळात ही दंडात्मक कारवाईच तोकडी ठरते. त्याव्यतिरिक्त काहीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.

त्यामुळे संबंधित संस्था, ठेकेदार अशा दंडात्मक कारवाईला घाबरत नाहीत. संबंधित कामांचा करारनामा करतानाच महापालिकेकडून थातुरमातुर अटी-शर्ती टाकल्या जातात. त्यामुळे महापालिकेला पुढे काहीही कठोर कारवाई करता येत नाही असे दिसते.

Dhule Municipal Corporation
Dhule Job News : धुळ्यात 14 सप्टेंबरला रोजगार मेळावा; येथे करा नोंदणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com