Dhule News : मनपाच्या कायम सेवेत घ्या; बदली कामगारांची मागणी; आत्मदहनाचाही इशारा

Dhule: Substitute cleaners while giving a statement to Additional Commissioner Nitin Kapdanis demanding that they should be taken into the permanent service of the Municipal Corporation
Dhule: Substitute cleaners while giving a statement to Additional Commissioner Nitin Kapdanis demanding that they should be taken into the permanent service of the Municipal Corporationesakal

धुळे : गेल्या २०-२५ वर्षांपासून महापालिकेत बदली सफाई कामगार म्हणून काम करत आहोत. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आम्हाला महापालिकेच्या कायम सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी बदली कामगारांनी महापालिका आयुक्तांकडे केली. दरम्यान, न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीला आत्मदहन करू, असा इशाराही या कर्मचाऱ्यांनी दिला.

आम्ही एकूण १६० कर्मचारी गेल्या २०-२५ वर्षांपासून महापालिकेत बदली सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहोत. महापालिकेत काम करत असल्याने आम्हाला इतर ठिकाणी काम दिले जात नाही. त्यामुळे आम्ही हलाखीचे जीवन जगत आहोत. (Take permanent service of municipality demand for replacement workers Also warning of self immolation Dhule News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Dhule: Substitute cleaners while giving a statement to Additional Commissioner Nitin Kapdanis demanding that they should be taken into the permanent service of the Municipal Corporation
Jalgaon News : वाहतुकीचे रस्ते अतिक्रमणाने भरले; पदाधिकारी, नगरसेवकांचाही आशीर्वाद?

आमचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास होत नाही. आमच्याबरोबर काम करणाऱ्या काही बदली कामगारांनी न्यायालयात दाद मागितली. अशा कामगारांना कायम नियुक्तीचे आदेश करण्याचे करण्यात आले. मनपानेदेखील त्यांना नियुक्ती दिली.

आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही १६० कामगार न्यायालयात अथवा इतर कुठेही दावा करू शकलो नाही. दरम्यान, वेळोवेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे लेखी व तोंडी विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ आश्‍वासने दिली.

आम्ही एवढ्या वर्षांत धुळ्यातील नागरिकांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला कायम सेवेत घ्यावे. २३ जानेवारी २०२३ पर्यंत याबाबत कार्यवाही न झाल्यास आम्ही सर्व बदली कामगार उपोषण करू व त्यानंतरही न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीला आत्मदहन करू, असा इशारा या कामगारांनी दिला. मागणी व इशाऱ्याचे निवेदन पिंकीबाई गोयर यांच्यासह इतर बदली कामगारांनी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले. शिवसेनेचे किरण जोंधळे उपस्थित होते.

Dhule: Substitute cleaners while giving a statement to Additional Commissioner Nitin Kapdanis demanding that they should be taken into the permanent service of the Municipal Corporation
Jalgaon News : साहेब ठेकेदार तुमच ऐकत नाही का? कळमसरे- शहापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांची नाराजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com