Jalgaon News : साहेब ठेकेदार तुमच ऐकत नाही का? कळमसरे- शहापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांची नाराजी

Kalamsare (T. Amalner): Bad condition of Shahapur road
Kalamsare (T. Amalner): Bad condition of Shahapur roadesakal

अमळनेर : कळमसरे (ता. अमळनेर) येथील सद्या शहापूर रस्त्याचे काम सुरू आहे. कळमसरे - शहापूर रस्त्यावर असलेल्या मोठी भवानी माता मंदिरापासून पुढचे आठशे मीटर अंतराचे काम हाती घेण्यात आले आहे. याच आठशे मीटर कामात कळमसरे गावाजवळ काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण होण्याचा मार्गावर आहे.

परंतु पुढे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. रस्त्यावर वापरली जाणारी खडी पूर्णत: माती मिश्रीत असल्याने होणारे डांबरीकरण खरच दर्जेदार होईल का? विहिरींवरील दगड रस्त्याचा कामासाठी सर्रास वापरला जात असून, यामुळे काम अगदी नित्कृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे समोर आले आहे. (Displeasure of villagers regarding poor work of Kalamsare Shahapur road Jalgaon News)

Kalamsare (T. Amalner): Bad condition of Shahapur road
Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!

कळमसरे गावाबाहेरील देखील कॉंक्रिटीकरणाचे काम नित्कृष्ट होत असताना येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत काम बंद पाडले होते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली असून, या रस्त्याचे डांबरीकरण निघाले आहे. पुढे सुरू असलेल्या कामावर या ठिकाणी टाकण्यात आलेली खडी मातीमिश्रीत आहे. पुन्हा तीच समस्या या रस्त्याविषयी निर्माण होणार, हे निश्चित.

गेल्या पंचवार्षिकमध्ये बऱ्याचदा या रस्त्याचे काम करा, याविषयी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र काही उपयोग झाला नाही. या पंचवार्षिक काळात या रस्त्याचे काम सुरू असून, मागील वर्षी उन्हाळ्यांत दोन किलोमीटर काम झाले आहे. यावर्षी एक किलोमीटर काम सुरू असून, तेही दर्जाहीन होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Kalamsare (T. Amalner): Bad condition of Shahapur road
Breaking News : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 3 युवक जागीच ठार

साहेब ठेकेदार तुमचं ऐकत नाही का?

या रस्त्यावर सद्य:स्थितीत काम सुरू असून, हा कळमसरे -शहापूर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो. मात्र या रस्त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातय का? ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसेल का? असे अनेक प्रश्न या शहापूर रस्त्याबाबत चर्चिले जात आहेत.

"या रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी दर्जेदारच आहे. एखाद ट्रिपमध्ये मातीमिश्रित खडी येऊ शकते. यामुळे कामाच्या ठिकाणी टाकण्यात आलेली सर्वच खडी खराब आहे, असे म्हणता येणार."

श्री. खांबोरे, अभियंता, जिल्हा परिषद, जळगाव

Kalamsare (T. Amalner): Bad condition of Shahapur road
Nashik News : महामार्गावर गोंदेजवळ पोलिसांच्या वाहनाला अपघात; तीन पोलीस कर्मचारी जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com