...अन्‌ तलाठ्याने तहसीलदारांवर उधळल्या नोटा; सर्वत्र चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money

...अन्‌ तलाठ्याने तहसीलदारांवर उधळल्या नोटा; सर्वत्र चर्चांना उधाण

चिमठाणे : शिंदखेडाचे शहर तलाठी तुषार पवार यांनी तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्यावर एका लग्नाच्या सार्वजनिक कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तालुक्यात त्याची चर्चा आहे. निमित्त होते, एका लग्नाच्या स्वागत सभांरभाच्या सार्वजनिक कार्यक्रमाचे.

तहसीलदार सुनील सौंदाणे एका महिलेसोबत पान खाताना दिसत असून, पान स्टॉलधारकाने अगोदर त्यांना पान दिले व त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या महिलेला पान खाण्याची ऑफर दिली. परंतु त्या महिलेने सोबत असलेल्या तहसीलदार सैदाणे यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला. एवढेच नाही, तर त्या पान स्टॉलधारकाने या प्रसंगी त्या संबंधित महिलेला एक शेर ऐकवला व एक गाणे वाजवले. त्यामुळे त्याने उपस्थितांची चांगलीच करमणूक होऊन दाद मिळवली. त्यानंतर तलाठी पवार यांनी खिशातून नोटा काढून तहसीलदार सैंदाणे व त्या महिलेवर उधळल्या. सार्वजनिक समारंभात नोटांची उधळपट्टी करतानाचा सदर व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. सार्वजनिक ठिकाणी तहसीलदारवर असलेली स्वामीनिष्ठा दर्शविण्यासाठी तलाठी पवार यांनी नोटांची उधळण केल्याबद्दल जनमानसात महसूल खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. यावर जिल्हाधिकारी जलज शर्मा व शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: जळगाव : नव्याने तयार झालेल्या महामार्गावर तडे बुजविण्याचा टाइमपास

हेही वाचा: विचखेडे सरपंच, उपसरपंच अपात्र; शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले

Web Title: Talathi Dissipate Currency Notes On Tehsildar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..