Dhule : होळनांथेच्या तलाठ्याला लाच घेताना पकडले

talathi dnyaneshwar borase
talathi dnyaneshwar boraseesakal

शिरपूर (जि. धुळे) : सातबाऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारताना होळनांथे (ता. शिरपूर) येथील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २३) सकाळी मुद्देमालासह अटक केली. (Talathi of Holnanthe caught while taking bribe Dhule Latest Crime News)

होळनांथे मंडळांतर्गत गावातील सातबाऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी संबंधित तक्रारदार बोरसे याच्याकडे गेला होता. या कामासाठी आठशे रुपये लागतील, तेही लगेचच आणून द्यावे लागतील, असे बोरसे याने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती दिली.

विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खात्री करून मंगळवारी होळनांथे येथील तलाठी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून आठशे रुपये स्वीकारताच पथकाने बोरसेवर झडप घातली. त्याला थाळनेर पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंह चव्हाण, हवालदार राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संदीप कदम, संतोष पावरा, प्रशांत बागूल, रामदास बारेला, प्रवीण पाटील, महिला पोलिस गायत्री पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली. संशयित ज्ञानेश्वर बोरसेच्या शहरातील वासुदेव बाबानगर येथील घरीही झडती घेण्यात आली.

talathi dnyaneshwar borase
Nashik : 5 महिन्‍यांच्‍या श्रीशाकडे आधारकार्डपासून पासपोर्ट

अखेर घोरपड आली

मंगळवारी सकाळपासूनच शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात आज घोरपड येणार आहे, अशी चर्चा सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला घोरपड या सांकेतिक नावाने ओळखले जाते. कारवाईचा सुगावा लागल्याने बहुतांश विभागांचे बडे अधिकारी आणि त्यांचे विशेष सेवक बेपत्ता झाले होते. कारवाई कुठे होणार याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. अखेर होळनांथे येथे कारवाई झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

talathi dnyaneshwar borase
मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 गंभीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com