monsoon
sakal
तळोदा: शहरासह तालुक्यात यंदा पावसाने चांगले सातत्य राखत कधी जोरदार, तर कधी रिपरिप लावली. त्यामुळे खरिपाची पिके तरारली असून, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढावली व धनपूर हे सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. एकंदरीत आतापर्यंत झालेल्या पावसाने बळीराजा चांगलाच सुखावला आहे.