शिक्षकाच्या कृतीमुळे समाजापुढे आदर्श; टॅक्सी चालकाचे पाकिट केले परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकाच्या कृतीमुळे समाजापुढे आदर्श; टॅक्सी चालकाचे पाकिट केले परत

शिक्षकाच्या कृतीमुळे समाजापुढे आदर्श; टॅक्सी चालकाचे पाकिट केले परत

नंदुरबार : येथील शिक्षकाच्या कृतीमुळे समाजात आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचा प्रत्यय आला आहे. या शिक्षकाने सापडलेले पाकिट प्रामाणिकपणे परत केले आहे.

सुनील साठे असे या शिक्षकाचे नाव आहे. नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शिवदर्शन विद्यालय भालेर येथील कार्यरत शिक्षक श्री. साठे घरगुती कामानिमित्त नंदुरबार शहरातील उड्डाणपुलावरून जात असताना त्यांना पैसे, सिम कार्ड, एटीएम कार्ड, इतर महत्त्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट सापडले. त्यांनी पाकिट उघडले असता एका टॅक्सी चालकाचे असल्याचे समजले. श्री. साठे यांनी तत्काळ नंदुरबार येथील बस स्थानकासमोरील टॅक्सी स्टॅंड गाठून उपस्थित टॅक्सी चालकांशी चर्चा केली. संबंधित टॅक्सी चालक यांच्याशी संपर्क साधत त्यांना पाकिट परत करून प्रामाणिकतेचे दर्शन घडविले.

हेही वाचा: MSRTC Bus : धुळे आगाराला रोज 20 लाखांचे उत्पन्न

हेही वाचा: दीड एकरवर आधुनिक रेशीम शेती; वर्षाला 8-9 लाखांचे विक्रमी उत्पन्न

Web Title: Teacher Returned Taxi Drivers Wallet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :teacherdrivertaxi
go to top