समस्या सोडवण्यासाठी नाशिकला भरणार शिक्षकांचा दरबार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

येवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी याचे आयोजन केले असून प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे.

याबाबत दराडे यांनी सांगितले कि, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन स्तरावर सुरूच आहे. पण काही प्रश्न असे आहेत की, ज्यांची सोडवणूक विविध अधिकारी व कार्यालयीन पातळीवर होऊ शकते याच हेतूने शिक्षकांचा दरबार आयोजीत करण्यात आला आहे. 

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना चालना मिळावी तसेच शिक्षक बांधवाना आपले प्रश्न मांडण्यास व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नाशिकसह, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शिक्षकांसाठी याचे आयोजन केले आहे. एकलहरे (नाशिक) येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी दोन वाजता आयोजन करण्यात आले आहे. आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह विभागीय उपसंचालक रामचंद्र जाधव, सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), वेतन पथक अधिक्षक,नाशिक बोर्डाचे अध्यक्ष,सचिव व इतर अधिकारी या दरबाराला उपस्थित राहणार आहेत. शिक्षकांनी प्रश्न मांडण्यासाठी व ते सोडवण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन दराडे यांनी केले आहे.

या बैठकीत अंशदायी पेन्शन योजना, प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शालार्थ आयडी, आरटीई प्रमाणपत्र वितरण, २०१२ नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या,२००६ च्या दप्तर दिरंगाई बाबत अंबलबजावणी, सेवाजेष्ठता यादी, भविष्य निर्वाह निधी पावत्या मिळणे, वैद्यकीय बिलांबाबत आढावा, महिन्याच्या १ तारखेला नियमित वेतन होणे, अल्पसंख्याक शाळांच्या समस्या, नियुक्ती व अनुशेष,वरिष्ठ व निवड श्रेणी, शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती व मान्यता यासह शिक्षकांच्या इतर महत्वाच्या विषयाचा यावेळी आढावा घेतला जाणार आहे.

शिक्षकांचे अनेक निवेदने आलेले असून या तक्रारीं अधिकाऱ्यांमार्फत सोडवणे शक्य असेल तर तत्काळ त्यावर निर्णय घेतला जाईल तर जे प्रश्न शासन स्तरावरील असतील त्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे दराडे म्हणाले. वैयक्तिक समस्या असतील तर शिक्षकांनी दोन प्रतीत सर्व कागदपत्रे सोबत आणावीत, दरबारापूर्वी सकाळी ११ वाजता सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विचारविनिमय बैठक होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher's court to fill Nashik to solve problems