Nandurbar Crime News : नवापूरला घराच्या खिडकीची ग्रील तोडून चोरी; पोलिसांसमोर मोठे आव्हान

The police during the inspection of the belongings stolen by the thieves at Ishwar Tatia's house.  the broken window grill.
The police during the inspection of the belongings stolen by the thieves at Ishwar Tatia's house. the broken window grill.esakal

Nandurbar Crime News : शहरातील मुख्य रस्त्यावरील ‘समता ट्रेडिंग’च्या वर असलेल्या घराच्या खिडकीची ग्रील तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. चोरीत अकरा लाख ८४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

नवापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. (Theft by breaking window grill of house in Navapur nandurbar crime news )

स्टेट बँकेच्या शेजारी समता ट्रेडिंगचे ईश्वर टाटिया यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. सततच्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे.

नवापूर शहरातील मेन रस्त्यावरील समता ट्रेडिंग कंपनीचे संचालक ईश्वर टाटिया यांच्या राहत्या घरी वरच्या मजल्यावर चोरट्यानी रोकड, सोन्या चांदीचे दागिन्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या चोरीने नवापूर शहरात भीतीच वातावरण आहे. नवापूर पोलिस ठाण्यात टाटिया यांनी फिर्याद दिली. नवापूर पोलिस तपास करीत आहे.

श्री. टाटिया १३ नोव्हेंबरला कुटुंबासह राजस्थानमधील जोधपूर येथे कुलदैवताचा दर्शनासाठी गेले होते. १६ नोव्हेंबरला सायंकाळी ते घरी आले. घराचे कुलूप उघडले असता स्टोअर रूम, कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले.

The police during the inspection of the belongings stolen by the thieves at Ishwar Tatia's house.  the broken window grill.
Nandurbar Crime News : 16 लाखांचा पानमसाला, गुटखासाठा जप्त

दिवाळीत चोरटे बंद घरांना टार्गेट करत आहेत. त्यातील काही चोरटे पोलिसांच्या हाती लागतात. परंतु शहरातील मुख्य रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी झालेल्या चोरीने पोलिसांना आव्हान दिले आहे.

घरातील दोन रूमची खिडकीची ग्रील तोडून चोटांनी घरात प्रवेश करून चोरी केली. घराचे नवीन काम सुरू असल्याने सीसीटीव्ही बंद होते. त्याचा फायदा घेत चोरांनी डल्ला मारला. सराईत चोरट्यांनी ग्रील तोडण्याचे साहित्य वापरून चोरी केली. घटनेनंतर नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले आहे. चोरटे पोलिस कधी जेरबंद करतील याकडे संपूर्ण शहरात लक्ष लागले आहे. वरिष्ठ अधिकारी नवापूर शहरातील वाढत्या चोरी संदर्भात काय ठोस उपाययोजना करतात, याकडे लक्ष लागून आहे.

The police during the inspection of the belongings stolen by the thieves at Ishwar Tatia's house.  the broken window grill.
Nandurbar Crime News : कुख्यात गुन्हेगार वर्षभरासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com