Dhule : हायस्कूलच्या कॅन्टीनमधून साहित्य लंपास करणारे चोरटे गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thief Behind Bars

Dhule : हायस्कूलच्या कॅन्टीनमधून साहित्य लंपास करणारे चोरटे गजाआड

धुळे : मोहाडी परिसरातून वाहनांच्या बॅटऱ्या (Vehicle Battery) लंपास करणाऱ्या आणि नूतन पाडवी हायस्कूलच्या कॅन्टीनमधून साहित्य लंपास (Theft) करणाऱ्या चोरट्यांना मोहाडीसह शहर पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. (theft from high school canteen thieves Arrested Dhule News)

शहरातील नूतन पाडवी हायस्कूलच्या कॅन्टीनमध्ये मंगळवारी सकाळी चोरीची घटना घडली. हा गुन्हा अभिजित रवींद्र कासोदे (वय ३२, रा. फाशीपूल, जगदीश पान सेंटर मागे, धुळे) याने केल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाने शोध पथकाने कासोदेला पकडले. पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने नूतन पाडवी हायस्कूलच्या कॅन्टीनमधून तीन गॅस शेगड्या, चार पातेले, कढाई, अशी भांडी नेल्याची व ती जितेंद्र संतोष सोनवणे (वय २०, रा. महींदळे) यास विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करत गुन्हा उघडकीस केला. श्री. देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील, शोध पथकाचे उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, कर्मचारी विलास भामरे, दिनेश परदेशी, नीलेश पोतदार यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: वऱ्हाडाची क्रुझर, एसटी, स्कुल बसला पसंती; ट्रॅक्टर, ट्रकवर कोणी बसेना

अवधान शिवारातील बुलेट शोरुममागे फिर्यादी युसूफ सैफुद्दीन सैफी यांच्या मालकीचे सैफी मेटल सप्लाय या खडी क्रशर येथील वाहनांमधील बॅटऱ्या चोरीस गेल्या. याप्रकरणी मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल होता. तपासात हवालदार प्रभाकर ब्राम्हणे यांच्यासह कर्मचारी पथकाने संशयित रितीक ऊर्फ निक्की अमरसिंग पंजाबी (वय २५, रा. कोळवले नगर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३६ हजारांच्या बॅटऱ्या व दहा हजारांची विनाक्रमांकाची दुचाकी, असा एकूण ४६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून ४८ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला. ही कामगिरी मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बी. आर. कोते, हवालदार प्रभाकर ब्राम्हणे, श्याम काळे, राहुल पाटील, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, समीर पाटील, राहुल गुंजाळ, मुकेश मोरे, जयकुमार चौधरी यांनी केली.

हेही वाचा: Nashik : आठवडे बाजारात आंब्याचेच राज्य

Web Title: Theft From High School Canteen Thieves Arrested Dhule News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top