Dhule Crime News : एकाच रात्री 6 घरांत चोरी! घरमालक गावी परतल्यावरच कळणार चोरीचा आकडा

theft news
theft newsesakal

सामोडे (जि. धुळे) : येथे रविवारी (ता. ८) रात्री चोरट्यांनी जुनागाव परिसरातील सहा बंद घरांत हात सफाई केली. यात फकिरा राघो घरटे या शेतकऱ्याच्या घरातील आदल्या दिवशी सोयाबीन विकून आलेले पैसे, कांद्याची लागवड करण्यासाठी घराच्या पत्र्याच्या कोठीत बाजरीमधील ५५ हजार रुपये व त्यांच्या पत्नी चंद्रभागा फकिरा घरटे यांच्या पेटीतून नऊ हजार ५०० रुपये असा ६४ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी नेली. (Theft in 6 houses in one night amount of theft will known only after home owner returns to village Dhule Crime News)

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिंदे गल्लीमधील मधुकर वेडू शिंदे यांच्या घराकडे वळविला. या बंद घरातील कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील चार कपाटे, एक पेटी व सर्व सामान अस्ताव्यस्त करत पूर्ण घराची झडती घेतली.

हे दांपत्य पायी वारीला गेले असल्या कारणाने घरातील किती मुद्देमाल चोरीस गेला हे अद्याप समजू शकले नाही. त्यानंतर चोरट्यांनी भररस्त्यावरील निवृत्त शिक्षक पंढरीनाथ राजाराम घरटे दाम्पत्य बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरातील कुलूप व कडीकोयंडा तोडून घरातील दोन कपाटांतील लॉकर तोडून पाहिले असता त्यांना किरकोळ ऐवज हाती लागला.

त्यांनी महात्मा फुले चौकातील सुनील राजाराम पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून कपाट व कोठ्यांमधील सामान अस्ताव्यस्त करत तेथेही त्यांच्या हाती काही मिळाले नाही तर तिथून त्यांनी पीरबाबा गल्लीतील राजेंद्र साहेबराव भदाणे यांच्या मालकीच्या जवळजवळ असणाऱ्या दोन्ही घरांत चोरट्यांनी कुलूप व कडीकोयंका तोडून कपाट व लॉकर तोडून तसेच कॉटमधील सामान अस्ताव्यस्त करून दोघे घरांची झडती घेतली.

theft news
Pune Crime News: अजबच ! पुण्यात पत्ता विचारल्यामुळे केली मारहाण

त्यात किती ऐवज चोरट्यांच्या हाती लागला हे घरमालक बाहेरगावी असल्याने समजू शकले नाही. या सहा घरांची चोरी बंद अवस्थेत करण्यात आल्यामुळे एकून चोरी किती झाली हे अद्याप समजू शकले नाही.

चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी नाना कृष्णा कॉलनी व दत्तनगर येथील एकाच रात्रीतून पाच ठिकाणी घरफोडी केली होती. गेल्या महिन्यात दोन शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे अवजार, रोटावेटर व आटोपलटी नांगर असा दोन लाखांचा ऐवज रात्रीतून चोरून नेला. रविवारी रात्रीतून सहा घरफोड्या झाल्या. या संदर्भात पिंपळनेर पोलिस ठाण्यामार्फत तपास सुरू आहे.

सामोडे गावात बऱ्याच दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू असल्याकारणाने सामोडे ग्रामपंचायतीने त्वरित गावात चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गावात गस्त वाढवावी

चोरीचे सत्र सुरू असल्याने शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले असून, प्रशासनाने चोरट्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा व पोलिसांकडून त्वरित गावात गस्त वाढवावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.

theft news
Jalgaon Crime News : विवाहिता, मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com