esakal | कांदा हब असलेल्या 'कापडणे'तच तुटवडा

बोलून बातमी शोधा

There is a shortage of onions in Kapdane village}

एकरभर क्षेत्रात केवळ २०-२५ क्विंटल कांद्याचा उतारा बसला आहे. भाव असूनही कांदा परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता कांदा हबमध्येच कांद्याचा तुटवडा भासत आहे. 

uttar-maharashtra
कांदा हब असलेल्या 'कापडणे'तच तुटवडा
sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस झाल्याने कांद्याचे रोप हाती आले नाही. कांदा क्षेत्र अल्प होते. खरिपानंतर कांदा बियाण्यांची उगवणक्षमता अवघी २० ते ३० टक्के होती. परिणामी महागडे रोप घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ‍कांदा बियाण्याची थेट पेरणी केली. तरीही उबवणीवर परिणाम झाला. एकरभर क्षेत्रात केवळ २०-२५ क्विंटल कांद्याचा उतारा बसला आहे. भाव असूनही कांदा परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता कांदा हबमध्येच कांद्याचा तुटवडा भासत आहे. 

कर्कश आवाज करणाऱ्या १७ बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई

कांद्याचे क्षेत्र घटले 

जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामापासून कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अतिपावसाने खरिपात कांद्याचे उत्पादन २० टक्के आले नाही. रब्बीत कांदा बियाण्याची उबवणक्षमता अवघी २० ते ३० टक्केच होती. परिणामी कांद्याची लागवड घटली. सध्या कांदा काढणी सुरू झाली आहे. मात्र एकरी उत्पादन प्रतिक्विंटल २० ते २५ निघत आहे. 

कांद्याला भाव मात्र उत्पादन कमीच 

सध्या कांद्याचे दर बऱ्यापैकी आहेत. मात्र उत्पादनच कमी असल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उत्पादन अधिक असते, तेव्हा भाव मिळत नाही. भाव असतो तेव्हा उत्पादन घटलेले असते. शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादन जुगाराचा खेळ झाला आहे. दरम्यान, खानदेशात कापडणे परिसर कांदा उत्पादनाचे हब समजले जाते. मात्र येथे सध्या कांद्याची वानवा जाणवत आहे. 

आम्ही कांदा उत्पादनात कधीही फेल ठरलेलो नाहीत. मात्र यंदा बियाण्याची उबवणक्षमता आणि वातावरणाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. 
- संभाजी पाटील, कांदा उत्पादक शेतकरी