Nandurbar News : चोरट्यांनी गॅरेज दुकानांकडे वळवला मोर्चा

Crime News
Crime Newsesakal

तळोदा : तळोदा शहरात चोरट्यांनी घरफोडीनंतर आपला मोर्चा गॅरेज दुकानांवर वळविला आहे. शुक्रवारी (ता. ६) रात्री शहादा रस्त्यावरील अमरधामनजीकच्या दोन गॅरेजमधून साडे तीन लाखांचे साहित्य लंपास केले आहे.

या प्रकरणी दोन्ही मालकांनी पोलिसात तक्रार दिली आहे. गॅरेज मधून साहित्य चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (Thieves theft in garage shop Two shops broken into goods worth three and a half lakhs theft Nandurbar Crime News)

Crime News
Nashik News : 12 वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील चौथा संशयित गजाआड

शहरातील शहादा रस्त्यावरील अमरधामनजीक जे. के. मोटार व न्यू केरला टायर ही दुकाने आहेत. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी व्हीलसह चार टायर, ५० ते ६० लिटर डिझेल, लोखंडी लायनर ड्रम असा दीड लाखाचे साहित्य चोरून नेले. शुक्रवारी सकाळी गॅरेज मालक खलील अन्सारी यांनी दुकान उघडल्यानंतर त्यांना संपूर्ण साहित्य विखुरलेले दिसून आले. त्यातील साहित्य लंपास केल्याचे देखील दिसून आले.

चोरट्यांनी आपला मोर्चा येथून जवळ असलेल्या टायर पंक्चर काढणाऱ्या न्यू केरला टायर या दुकानाकडे वळविला. चोरट्यांनी हे बंद दुकान फोडून डिस्क, कटर मशिनचे पार्टस व मोटार असा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या दुकान मालकालाही दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार दिसून आला. खलिल अन्सारी, शफीक या दोन्ही मालकांनी शुक्रवारी चोरट्याविरोधात तळोदा पोलिसात तक्रार दिली आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Crime News
Jalgaon News : सीएसटी- दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार

घटनांचा तपास संथगतीने

शहरात चोरीच्या व घरफोडीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. बंद घरांना अधिक टार्गेट केले जात आहे. मोटार सायकल चोरीचा घटना देखील वाढल्या आहेत. मात्र, चोरी व घरफोडीच्या घटनांचा तपास संथ गतीने होत असल्याचे नागरिक सांगतात. त्यात घरफोडी करणारे मोकाट राहत असल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरातील चोरी व घरफोडींच्या घटनांचा तपास लावून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Crime News
Jalgaon Crime News : पोलिस ठाण्यातून संशयित निसटले; शस्त्र, रॉडचा वापर, तरी हाणामारीच दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com