Dhule Crime News : मुलींची छेडखानी महागात; देवपूरच्या घटनेप्रकरणी दोघे 6 महिने तुरुंगात

crime
crime esakal

Dhule Crime News : मुलींची छेड काढणे दोघा तरुणांना महागात पडले. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे टारगटपणा करणारे, तसेच रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहे.

देवपूरमध्ये दहावीतील पीडित विद्यार्थिनीची मे २०१८ मध्ये दोघा तरुणांनी छेड काढण्यास सुरवात केली. (two youth in jail for 6 months Tease girl dhule crime news)

पीडित शालेय विद्यार्थिनीच्या घरासमोर वारंवार जाणे, तिला हातवारे करणे, इशारे करणे, तिच्याकडे एकटक पाहणे, तसेच शाळेत जाताना तिचा नेहमी पाठलाग करणे, हॉर्न वाजविणे, तिच्या अंगावर चिठ्ठी फेकणे आदी त्यांच्या कृत्यांमुळे ती पीडित विद्यार्थिनी त्रस्त होती व मानसिक तणावात वावरत होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी आरोपी नरेश प्रकाश चव्हाण व मनीष लहू गवळे यास प्रत्येकी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

आरोपपत्र दाखल

दोघा आरोपींनी विविध प्रकारे शालेय पीडित विद्यार्थिनाला त्रास दिला. यात आरोपी चव्हाण व गवळे याच्या त्रासाला कंटाळून पीडिता विद्यार्थिनीने ६ जुलै २०१८ ला पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १९ (४) व १२ अन्वयेदेखील फिर्याद देण्यात आली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, यांनी सखोल तपास केला. नंतर दोघा आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

साक्षीदारांची साक्ष

खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश यास्मीन देशमुख यांच्यापुढे चालले. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी सरकार पक्षातर्फे फिर्यादी पीडिता, घटनास्थळाचे पंच तसेच साक्षीदार शाळेचे मुख्याध्यापक, तपासी पोलिस अधिकारी संदीप पाटील, पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आदींच्या महत्त्वपूर्व साक्षी नोंदविल्या.

crime
Dhule Crime News : 24 तासांत आवळल्या संशयिताच्या मुसक्या; इलेक्ट्रिक मोटारींवर सालदाराचाच डल्ला

या खटल्यात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना जिल्हा सरकारी वकील तवर यांनी साक्षीदारांची साक्ष व त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनी दिलेल्या विविध आदेशांचा आधार घेत आरोपी चव्हाण व गवळे याला अधिकाधिक शिक्षा द्यावी, असा युक्‍तिवाद केला.

शिक्षेचा निकाल

न्या. देशमुख यांनी सर्व बाबींचा सांगोपांग विचार करीत व सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील तवर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत दोघा आरोपींना भारतीय दंडविधान कलम ३५४ ड, ३४१ सह कलम ३४ अन्वये प्रत्येकी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा, तसेच प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड व तो न भरल्यास ९५ दिवसांची साध्या कारावासाच्या शिक्षेचा आदेश दिला.

तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११ (८) व ९२ अन्वये सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा, तसेच प्रत्येकी दोन हजार हजार रुपयांचा दंड व तो न भरल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कारावासाच्या शिक्षेचा आदेश दिला. ॲड. तवर त्यांना पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पैरवी अधिकारी हवालदार सुशीला नरपतसिंग वळवी यांचे सहकार्य लाभले.

crime
Dhule Crime News : सराईत दुचाकीचोर जेरबंद; कारवाईत 5 दुचाकी जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com