
धुळ्यात बर्निंक ट्रकचा थरार!
धुळे : शहरातील शंभर फुटी रस्त्याजवळ रविवारी (ता.२६) बर्निंग ट्रकचा (Burning Truck) थरार पाहायला मिळाला. कच्च्या तेलाचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटून ट्रकने पेट घेतला. महापालिकेच्या (Municipal Corporation) अग्निशमन बंबांनी आगा आटोक्यात आणली पण ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानीही टळली. (Thrill of burning truck in Dhule Dhule News)
हेही वाचा: वीजमीटर उपलब्ध होत नसल्यास संपर्क साधा : महावितरण कंपनी
मुंबईहून छत्तीसगडकडे जाणारा ट्रक (एलएल ०१ एएफ ५९०१) कच्या तेलाचा माल घेऊन जात होता. दुपारी बाराच्या सुमारास मुंबई-आग्रामहामार्गावरील पारोळा चौफुलीच्या काहीअंतरावर या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकला अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, ट्रकला आग लागल्यानंतर महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. या बंबाद्नारे आग आग आटोक्यात आणली. या आगीत ट्रकच्या टायरही जळून गेले, इतरही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिस दाखल झाले, पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा: Dhule : दरोडा टाकण्यापूर्वीच टोळी जेरबंद
Web Title: Thrill Of Burning Truck In Dhule Dhule News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..