Dhule : साक्रीतील वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी

Traffic
Trafficesakal

साक्री (जि. धुळे) : साक्री शहरांतर्गत विशेषतः बसस्थानक (Bus stand) मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, यावर मार्ग काढून ही वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Traffic congestion in Sakri is a headache for citizens Dhule News)

शहरांतर्गत वाहतूक कोंडी तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडी या दोन्ही समस्या साक्रीकरांना सातत्याने भेडसावत होत्या. यात बायपास रस्ता सुरू होऊन या रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी सुटण्यास मदत झाली आहे. मात्र शहरांतर्गत होणारी वाहतूक कोंडी मात्र, अजूनही न सुटल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

बसस्थानक मार्ग, लक्ष्मी रोड व मुख्य बाजारपेठेतील रस्ते यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस डोकेदुखी बनत आहे. रस्त्यालगत वाढलेले अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, हॉकर्स, यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने भेडसावत असल्या तरी यावर अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना होऊ न शकल्याने त्या दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असून यावर नगरपंचायत प्रशासनाने प्रसंगी पोलिस प्रशासनाची मदत घेऊन अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही ठोस पर्याय अवलंबण्याची गरज असून, नगरपंचायत प्रशासनाने वाहतूक कोंडीवर येत्या काळात ठोस उपाययोजना केल्या तरच साक्रीकरांना भेडसावणारी समस्या सुटण्यास मदत होऊन रस्ते मोकळा श्वास घेतील.

Traffic
जळगाव : नार्को कोऑर्डिनेशन सेंटरची जिल्हास्तरीय समिती स्थापन

अवजड वाहनांना व्हावी प्रवेशबंदी

शहरात अनेक रस्ते हे अतिशय अरुंद झाले आहेत. अशावेळी या रस्त्यांवर दोन वाहने एकावेळी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, विशेषतः यावर अवजड वाहन आल्यानंतर तर मोठी समस्या निर्माण होते. अशावेळी शहरात व्यावसायिकांना माल पोचवण्यासाठी येणाऱ्या अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी करावी किंवा ठराविक वेळ निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Traffic
लेडी ‘डॉन’ची दबंगगिरी; हद्दपार असतानाही आढळल्याने गुन्हा दाखल

बाजाराची जागा बदलण्याची गरज

दरम्यान शहरात दररोज भरणार बाजार तसेच रविवारी भरणारा आठवडे बाजार हा देखील वाहतुकीच्या मुख्य मार्गांवर भरतो. यातून या समस्येत भरच पडते. अशावेळी एखाद्या मैदानावर अथवा मुख्य बाजारपेठेत जागा निश्चित करून सर्व विक्रेत्यांना त्याच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com